कोकण

तालुकास्तर ‘स्मार्ट ग्राम’मध्ये साळिस्ते ग्रामपंचायत अव्वल

CD

16464

तालुकास्तर ‘स्मार्ट ग्राम’मध्ये
साळिस्ते ग्रामपंचायत अव्वल
तळेरे, ता. ५ ः राज्यातील ग्रामपंचायत विकासकामात सहभाग करून घेण्यासाठी आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव (स्मार्ट ग्राम) योजनेची अंमलबजावणीसाठी तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींचे तालुकास्तरीय समितीने मूल्यांकन केले. यामध्ये १०० गुणांपैकी ९७ गुण मिळवून साळिस्ते ग्रामपंचायत अव्वल ठरली.
याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त झाला आहे. या यशामुळे साळिस्ते ग्रामपंचायतीचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे. यासाठी सरपंच प्रभाकर ताह्मणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कांबळे, गिरीश कांबळे, प्रेमलता गुरव, मानसी बारस्कर, हर्षदा ताम्हणकर, तेजल कुडतरकर, ग्रामपंचायत अधिकारी विशाल वरवडेकर, सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योगदान दिले. तसेच गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग व आर. एल. शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. पोलिसपाटील गोपाळ चव्हाण, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश साळिस्तेकर आदींचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT