कोकण

थोर व्यक्तिमत्वांचे विचार अंगिकारा

CD

16470

थोर व्यक्तिमत्वांचे विचार अंगिकारा

अजयराज वराडकर ः कट्टा येथे महात्मा गांधी, शास्त्री यांना अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ५ : थोर व्यक्तिमत्वे निर्माण होण्यासाठी काळ यावा लागतो आणि अशी थोर व्यक्तिमत्वे आपल्या भारतभूमीत जन्मली. त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज आपली प्रगती झाली. अशी व्यक्तिमत्त्वे समाजाला पर्यायाने आपल्याला प्रभावित करत असतात. त्यातून आपण सर्वांनीच बोध घेतला पाहिजे व त्यांचे स्मरण वेळोवेळी करणे आवश्यक आहे. अशा थोर लोकांच्या विचारांवर आपण जगले पाहिजे, असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी कट्टा येथे केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती तसेच कर्मयोगी, योगात्मा (कै.) डॉ. काकासाहेब वराडकर यांच्या ४८ व्या पुण्यतिथीनिमित्त वराडकर हायस्कूल येथे शालेय संसदेमार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला घालून दिलेले अहिंसेचे समर्थन करताना व मिळविलेल्या स्वातंत्र्याविषयी असणारी जाणीव याविषयी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, आपण अशा त्यागाच्या मूर्तीला वंदन करून त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. गांधीजींचा स्वच्छता संदेश नेहमी अंगीकारला पाहिजे, अशी अपेक्षा वराडकर यांनी व्यक्त केली. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेबद्दल व लालबहाद्दूर शास्त्री यांनी देशात राबविलेल्या अनेक योजनांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन, व्यायाम, पोषक आहार आणि शिस्त ही मूल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन केले.
मुख्याध्यापिका देवयानी गावडे यांनी प्रास्ताविक केले. इंग्रजी विभागातर्फे घेतलेल्या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे दिली. विज्ञान गणित शिक्षक पी. व्ही. कानूरकर यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. काकासाहेब वराडकर यांना श्रद्धांजली म्हणून कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी स्वरचित कविता सादर केली. संचिता करावडे, प्राची परब, भाग्यश्री सावंत, कृतिका लोहार, मयुर पेंडूरकर, दर्श वराडकर यांनी भाषणे सादर केली. स्वरा पेंडूरकर हिने महात्मा गांधी यांचे भजन गायिले. शाळा परिसराची स्वच्छ्ता करण्यात आली. हरित सेनेने वृक्षारोपण केले. प्रा. पालव यांनी सूत्रसंचालन केले. फोपळे यांनी आभार मानले. सुनील नाईक, सुधीर वराडकर, महेश वाईरकर, स्वाती वराडकर, प्रा. ध्वजेंद्र मिराशी, के. एम. हडलगेकर, भूषण गावडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT