कोकण

उपरकरांचा प्रवेश नेमका कुणी रोखला?

CD

16617

उपरकरांचा प्रवेश कुणी रोखला?

शिवसेना ठाकरे गटात मतभेद?; ‘मातोश्री’वरील बैठकीत कार्यकर्त्यांत चर्चा

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ५ ः विधानसभा निवडणुका महिनाभरावर आल्या असताना माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या प्रवेशावरून जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेंतर्गत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. बहुतांशी कार्यकर्त्यांची संमती असताना उपरकर यांचा प्रवेश नेमका कुणी रोखला? अशी चर्चा आता ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व करणारे माजी खासदार विनायक राऊत यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जिल्ह्यातील पक्षांतर्गत मरगळ आली आहे. पराभूत मानसिकतेत असलेल्या ठाकरे शिवसेनेला एका मोठ्या ‘बुस्टर डोस’ची गरज आहे, ही वस्तुस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होईल, अशी स्थिती आहे. अजूनही कुडाळ-मालवण विधानसभा वगळता शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निश्चित झाले नाहीत. पक्ष संघटना बांधणीचे काम पूर्णतः ठप्प आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ देईल, संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व करेल, असा आश्वासक चेहराही कार्यकर्त्यांना दिसत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रम आहे. त्यातच आता माजी आमदार उपरकर यांच्या पक्षप्रवेशावरून पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे समजते.
उपलब्ध माहितीनुसार, अलीकडेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची ‘मातोश्री’वर बैठक घेतली. यात सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. या बैठकीवेळी सिंधुदुर्गातील बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी उपरकरांना पक्षात प्रवेश द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केल्याची चर्चा आहे; परंतु काहींनी पडद्यामागून विरोध दर्शविल्याचे समजते. उपरकर यांचा प्रवेश नेमका कोण रोखतेय? त्यामागचे कारण काय? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे. उपरकरांनी अनेक वर्षे शिवसेनेत काम केले आहे. सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या जडणघडणीत त्यांचा वाटा आहे. त्यांनी जिल्हाप्रमुख म्हणून उत्तम काम केले आहे. त्यांचा पक्षात प्रवेश करून त्यांच्याकडे असलेल्या संघटन कौशल्याचा वापर पुन्हा पक्ष उभारणीसाठी करावा, अशी त्यांच्या प्रवेशाचे समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. उपरकर यांना मानणारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वर्ग आहे. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होईल. त्यामुळे त्यांचा प्रवेश करून घ्यावा, अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे केली आहे.
--------------
प्रमुख नेत्याचा विरोध
उपरकरांचा पक्षप्रवेश लोकसभा निवडणुकीपुर्वी होणार होता; परंतु त्यावेळी काही मोजक्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे त्यावेळी त्यांचा प्रवेश झाला नाही; परंतु आता त्यांना प्रवेश द्यावा यासाठी कार्यकर्त्यांकडून दबाव वाढत असताना एक प्रमुख नेता पक्षप्रवेशाला विरोध करीत आहे.
---
मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, हे जिल्ह्यातील हे प्रत्येक शिवसैनिकाला ज्ञात आहे. त्यामुळे अनेक जुन्या निष्ठावान शिवसैनिकांनी पक्षात प्रवेश करण्यासाठी माझ्याकडे आग्रह धरला आहे. पुन्हा एकत्र येऊन जोमाने काम करूया, असे त्यांचे म्हणणे असून, ही वस्तुस्थिती आहे. मी यापूर्वी देखील जिल्ह्यात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींविरोधात लढलो आहे आणि यापुढेही लढणार आहे.
- परशुराम उपरकर, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT