16512
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
वेत्येतील जमिनीत करावे
सुनील गावडे ः जागेचा प्रश्न सुटेल
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्वी ठरल्याप्रमाणे वेत्ये येथे ग्रामपंचायतीच्या जमिनीवर व्हावे. मंत्री दीपक केसरकर यांनी उशिरा सुचलेल्या शहाणपणातून तरी तसा निर्णय घ्यावा, असे आवाहन माजगाव विभागप्रमुख तथा वेत्ये माजी सरपंच सुनील गावडे केले आहे.
गावडे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सावंतवाडी येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जागेअभावी रेंगाळत ठेवण्यापेक्षा महाविकास आघाडीचे सरकार असताना वेत्ये ग्रामपंचायतीच्या जागेत होण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता, त्यासाठी माजी खासदार विनायक राऊत यांनी पुढाकार घेतला होता. वेत्ये ग्रामपंचायतीने दिलेला प्रस्ताव प्रशासन तसेच मंत्री दीपक केसरकर यांनी स्वीकारला होता. त्यामुळे हे हॉस्पिटल वेत्येत करावे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जमिनीअभावी रेंगाळत होते, तेव्हा वेत्ये ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी वेत्ये येथील ग्रामपंचायतीच्या जमिनीवर मल्टिस्पेशालिटी उभारण्याचा प्रस्ताव सादर केला होता. तत्कालीन खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांनी जागेवर येऊन पाहणीही केली होती; मात्र केसरकर यांनी सावंतवाडीचा हट्ट कायम ठेवला. आज केसरकर यांनी सावंतवाडीच्या जमीन प्रश्नावरून मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या निर्णायक भूमिकेवर भाष्य केले आहे. त्यामुळे वेत्ये ग्रामपंचायत येथे जमिनीवर मल्टिस्पेशालिटी उभारण्याचा निर्णय मंत्री केसरकर यांनी जाहीर केल्यास जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. मुंबई-गोवा महामार्गाच्या जवळपास ही जमीन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना फायदा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.