कोकण

आरक्षित समाजासाठी ‘ही’ धोक्‍याची घंटा

CD

16538
16539

आरक्षित समाजासाठी ‘ही’ धोक्‍याची घंटा

आमदार नीतेश राणे : कणकवलीत भाजपची संविधान बचाव रॅली

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ५ : आरक्षण संपविणार हे राहुल गांधी यांचे वक्तव्य म्‍हणजे संपूर्ण आरक्षित समाजासाठी धोक्‍याची घंटा आहे, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले. कणकवलीतील संविधान बचाव रॅलीत ते बोलत होते.
शहरातील जानवली नदी पुलापासून सकाळी अकरा वाजता भाजपची संविधान बचाव रॅली निघाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. त्‍यात आमदार राणे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. श्री.राणे म्‍हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना किंबहुना आंबेडकरांना विरोध हाच काँग्रेसचा अजेंडा आहे. त्‍यामुळे अमेरिकेतील मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी ‘‘भारतामधील आरक्षण संपविणार’’, असे वक्तव्य केले आहे. राहुल गांधीचे हे वक्तव्य म्‍हणजे आरक्षित समाजासाठी धोक्‍याची घंटा आहे. याबाबत समाजबांधवांमध्ये जनजागृती हाोण्यासाठी आज संविधान बचाव रॅली काढण्यात आली.’’
राणे म्‍हणाले, ‘‘काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते, निवडणूक आली की भाजप सरकारच्या विरोधात बोलतात. भाजप संविधान बदलणार, असे सांगून दिशाभूल करतात. पण, खरंतर काँग्रेसलाच आरक्षण संपवायचे आहे. काँग्रेसच्या जे पोटात होते तेच राहुल गांधींच्या ओठावर आले. आरक्षण हा विषय प्रत्‍येकाचा जिव्हाळ्याचा आहे. आज गाफील राहिलो तर आरक्षित समाज पुन्हा परिघाबाहेर फेकला जाईल. कदाचित उद्या काँग्रेस सत्तेवर आली तर निश्‍चितपणे असा टोकाचा निर्णय घेतला जाणार आहे.’’ भाजप जिल्‍हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्‍हाध्यक्ष नामदेव जाधव, डॉ. मिलिंद कुलकर्णी, रमाकांत जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. या सभेवेळी जिल्‍हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, अंकुश कदम, सदा ओगले, अजित कांबळे, भाजप युवा मोर्चा जिल्‍हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, गौतम खुडकर, रमाकांत जाधव, नवलराज जाधव, शारदा कांबळे, संतोष कानडे, मनोज रावराणे आदी उपस्थित होते.
---------------
...म्हणून आत्ताच जागे व्हा ः राणे
आमदार राणे म्‍हणाले, ‘‘आजच्या संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून आरक्षणाला कुणीही धक्‍का लावू शकणार नाही, असा संदेश संपूर्ण राज्‍यात, देशात गेला आहे. आज आरक्षणामुळेच अनेक गावांतील आरक्षित समाजबांधव सरपंच होऊन गावाचा विकास करत आहेत. अनेकांनी पंचायत समिती, जिल्‍हा परिषद, नगरपंचायतीची सभापती पदे भूषविली आहेत. नगरसेवक, नगराध्यक्ष होता आले; पण हेच आरक्षण जर काँग्रेसवाले काढून घेत असतील. तर उद्या त्‍या खुर्च्यांवर आरक्षित समाज बांधव असणार नाहीत. त्‍यांना सभागृह बघण्याचीही संधी मिळणार नाही. त्‍यामुळे सर्व समाजबांधवांनी आत्ताच जागे व्हावे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT