16546
नाईकांकडून आजारग्रस्तास मदत
मालवण : नांदोस (ता.मालवण) येथील कर्करोगावर शस्त्रक्रिया झालेल्या रावजी चव्हाण यांना औषधोपचारासाठी आमदार वैभव नाईक यांनी आर्थिक मदतीचा हात दिला. रावजी चव्हाण यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया झाली होती. आमदार नाईक यांना याची माहिती मिळताच चव्हाण कुटुंबीयांशी संपर्क साधत त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला. यावेळी चव्हाण कुटुंबीयांनी आमदार नाईक यांचे आभार मानले. नांदोसचे माजी सरपंच अशोक नांदोसकर यांनीही चव्हाण यांना आर्थिक मदत दिली. यावेळी अशोक नांदोसकर, प्रभाग अध्यक्ष विजय गावडे, माजी सदस्य दिलीप हंजनकर, ॲड. हृदयनाथ चव्हाण, शंकर चव्हाण, विजया नांदोसकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.