शिवसेनेतील निष्ठावंतालाच उमेदवारी
विनायक राऊत ः इतर पक्षातील कोणाचेही नाव नाही चर्चेत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : रत्नागिरी विधानसभा मतदार संघात उदय सामंत यांच्या विरोधात लढण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे सक्षम उमेदवार आहेत. पक्षाकडून निष्ठावंतालाच उमेदवारी दिली जाईल. इतर पक्षातील कोणाचेही नाव चर्चेत नाही. आजच्या बैठकीत विभागप्रमुखांनी निष्ठावंतांनाच संधी देण्याची मागणी केली आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या विनायक राऊत यांनी त्यांच्या कार्यालयात रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी सहसंपर्कप्रमुख राजू महाडीक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांसोबत राऊत यांनी चर्चा केली. त्यानंतर विभागप्रमुख हेमंत पवार, मयुरेश पाटील, राकेश साळवी, महेंद्र झापडेकर, उत्तम मोरे, किरण तोडणकर, भाऊ देसाई यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. या सर्वांशीच वैयक्तीक चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर सर्वच पदाधिकाऱ्यांशी एकत्रित चर्चा केली. उमेदवारीबाबत अंतिम निर्णय पक्षाध्यक्षच घेतील, असेही विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पक्ष जो कोणी उमेदवार देईल त्याचे प्रामाणिक काम करू; मात्र पक्षातीलच उमेदवार असावा, अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या.
---
दसऱ्यापर्यंत उमेदवार निश्चित होईल
शिवसेनेतील निष्ठावंतांनाच संधी द्यावी, अशी मागणी विभागप्रमुखांनी केली. दसऱ्यापर्यंत या मतदार संघातील उमेदवारीबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.