पोलिस उपनिरीक्षकास
चिपळुणात मारहाण
पोलिस ठाण्यातच प्रकार; दोघांना अटक
चिपळूण, ता. ५ ः लोकसेवेचे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकास दोघांनी पोलिस ठाण्यातच शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी घडली. पोलिस ठाण्यातच घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेत दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करून अटक केली. या घटनेतील संबंधित पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
सचिन दादासाहेब तुपे (वय ३४), विशाल वसंत खांडेकर (२४) (दोघेही रा. बलवडी (भाळवणी), ता. खानापूर, जि. सांगली), असे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिस उपनिरीक्षक अशोक सोमनाथ राठोड यांनी तक्रार दिली आहे. सचिन तुपे व विशाल खांडेकर या दोघांनी कळंबस्ते फाटा येथे लोकांबरोबर वादावादी केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर पोलिस ठाण्यात या प्रकाराची माहिती व त्याचे कारण समजून घेत असताना राठोड यांना तुपे व खांडेकर या दोघांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर खांडेकर याने राठोड यांचा गळा पकडून व वर्दी खेचून जिवे मारण्याची दमदाटी केली. यावेळी झालेल्या मारहाणीत अशोक राठोड हे जखमी झाले. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने तुपे व खांडेकर यांच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १३२, १२१ (१), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करून दोघांना तत्काळ अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.