वराड-कुसरवेतील
भक्तनिवास कामाला
नाईकांच्या हस्ते प्रारंभ
मालवण, ता. ८ : महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत वराड-कुसरवे येथील प. पू. श्री राणे महाराज मठ येथे भक्त निवास आणि हॉलचे बांधकाम करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी १ कोटी रुपये मंजूर केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आमदार नाईक यांनी पाठपुरावा करून हा निधी मंजूर केला होता. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, या कामाचे भूमिपूजन आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कुसरवे-वराड येथील प. पू. श्री राणे महाराज मठ हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक भाविक भक्तगण याठिकाणी भेट देऊन दर्शन घेतात. भाविक भक्तांच्या सोयीसाठी आमदार नाईक यांनी याठिकाणी भक्त निवास आणि हॉलसाठी १ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. सुसज्ज असे भक्तनिवास व हॉल याठिकाणी उभारला जाणार आहे. त्याबद्दल ट्रस्ट व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. यावेळी मुरलीधर गोवेकर, नित्यानंद म्हाडगुत, कुडाळ काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, आबा कोटकर, प्रकाश चोणकर, अवी नेरकर, गणेश वाईरकर, राजू सावंत, दाजी हडकर, संजय चव्हाण, आशिष परब, आप्पा परुळेकर, पेंडूर विभाग प्रमुख शिवा भोजने, वंदेश ढोलम, दर्शन म्हाडगुत, बाबू टेंबुलकर, नीलेश हडकर, हर्षल मोरजकर, दिलीप आचरेकर, सतीश चव्हाण, दुर्गानंद गावठे, सत्यवान चव्हाण, अरुण गावडे, रुपेश आमडोसकर, महेश परब, किरण रावले, अनंत चव्हाण, शिशुपाल राणे, संजना चव्हाण, शुभदा चव्हाण, योगिता वेंगुर्लेकर, स्वप्नील आपटे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.