सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख
कॅबिनेट मंत्री लोढा यांचा पुढाकार; आदर्श व्यक्तीमत्वांच्या नावाने ओळख
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील ७ शासकीय औद्योगिक संस्थांचा समावेश असून, त्यांना आदर्श व्यक्तीमत्वांची नावे देण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वीच १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता.
कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. याबाबत मंत्री लोढा म्हणाले की, औद्योगिक संस्थांचे नामकरण हा केवळ एक निर्णय नसून, महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा आहे. या संस्थांना आदर्श व्यक्तीमत्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल. युवकांचा कौशल्य विकास हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे आणि या नावांमुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आपल्या कार्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल. हा उपक्रम नव्या पिढीला त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी प्रेरणा देईल आणि त्यांच्या मेहनतीला एक दिशा देईल.
चौकट
नामकरण केलेल्या प्रशिक्षण संस्था
रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे नाव देण्यात आले आहे. महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राणी लक्ष्मीबाई, खेड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला क्रांतिकारी अनंत कान्हेरे यांचे, दापोली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला धोंडो केशव कर्वे यांचे, मंडणगड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला नाना फडणवीस यांचे, चिपळूण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान परशुराम यांचे तर संगमेश्वर प्रशिक्षण संस्थेला माधवराव मुळे यांचे नाव देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.