कोकण

राजापूर- 70 वर्षे पूर्ण झालेल्या 33 सभासदांचा सत्कार

CD

१७७७७

निवृत्त कर्मचारी समितीतर्फे
३३ सभासदांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ः राजापूर तालुका सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींसह ७० वर्षे पूर्ण झालेल्या ३३ सभासदांचा सत्कार करण्यात आला.
राजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला चव्हाण यांच्यासह अशोक देवरूखकर (कार्यवाह), मधूकर प्रभुदेसाई ( सहकार्यवाह), चंद्रकांत जानस्कर, पन्हळेकर, दिलीप मठकर, दिवाकर बोटले, शरद साखळकर, अशोक घुमे, नंदकुमार जाधव, धीरज पाटणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या संस्थेचे कार्यवाह देवरूखकर यांनी प्रास्ताविक केल्यानंतर सीए सिद्धेश करंगुटकर यांनी आयकरविषयी बहुमुल्य मार्गदर्शन केले.
वार्षिक सभेच्या इतिवृताचे धीरज पाटणकर यांनी वाचन केले. त्याला संपूर्ण सभागृहाने मंजुरी दिली. त्यानंतर देवरूखकर यांनी २०२३-२४ चा संघटना कार्यअहवाल व जमाखर्च वाचन केले. संघटनात्मक व सामाजिक शैक्षणिक कार्यात योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या सभेमध्ये जाधव यांनी पेन्शन योजना, संघटनात्मक बांधणी, सेवाशर्तीचे नियम आदींविषयी मार्गदर्शन केले तर, देवीदास मयेकर यांनी विविध योजना संस्थेची आर्थिक स्थिती व विविध उपक्रम या विषयी विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात अशोक चव्हाण यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. या सभेचे जानस्कर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT