कोकण

चिपळूण ः चिपळूण ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी मंगेश पिंगळे

CD

17779

चिपळूण ग्रामसेवक संघटनेच्या
अध्यक्षपदी मंगेश पिंगळे
चिपळूण, ता. ९ः चिपळूण तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी मंगेश पिंगळे यांची एकमताने निवड केली आहे. संघटनेचे माजी अध्यक्ष संदीप कदम यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली.
चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ग्रामसेवक संघटनेची बैठक झाली. या वेळी संघटनेच्या विविध विषयावर चर्चा झाली. माजी अध्यक्ष संदीप कदम यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नवीन अध्यक्ष निवडीवर चर्चा करण्यात आली. संघटनेतील अभ्यासू असलेल्या कोळकेवाडीचे ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पिंगळे यांच्या नावाला सर्वांची पसंती मिळाली. त्यानंतर सचिवपदी रोहिदास हांगे यांची फेरनिवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी राहुल कोरडे, महिला उपाध्यक्षा जान्हवी साळवी, सहसचिव सुप्रिया मालगुणकर, कायदेशीर सल्लागारपदी संदीप कदम, सदस्यपदी श्रीधर भागवत, मनोहर गायकवाड, दिनेश पारधी, संगीता गावडे, विश्वास पवार यांची निवड झाली. रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक पतसंस्था संचालक म्हणून अर्चना लांजेकर, पराग बांद्रे यांना संधी देण्यात आली तसेच जिल्हा संघटना सदस्यपदी बजरंग हराळे, जिल्हा कौन्सिलर म्हणून महादेव सुर्वे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष पिंगळे यांनी यापूर्वी तालुक्यात सचिवपदाची जबाबदारी पार पाडली होती शिवाय ग्रामसेवक पतसंस्था चेअरमन म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economic Crisis: पाकिस्तान व फिलिपिन्समध्ये चार दिवसांचा आठवडा; दरवाढीमुळे आपत्कालीन उपाययोजना, इंधन वाचविण्याचा प्रयत्न!

ICC T20I Rankings: वरुण चक्रवर्तीनं 'नंबर वन'चा ताज गमावला, तर अभिषेक शर्माच्या सिंहासनाला इशान किशनचं देतोय आव्हान

Sarpanch Bribe Case : गरीब ग्रामस्थाची झोपडी दुरुस्त करण्यासाठी सरपंचाने 15 हजारांची मागितली लाच, 'असा' अडकला जाळ्यात!

Kalamb Municipal Council Tightens Rules Against Garbage Dumping: कळंबमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर; नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Iran Missile Attack: सततच्या हल्ल्यांमुळे तणाव कायम; इराणकडून आखाती देशांवर क्षेपणास्त्र हल्ले, शस्त्रसंधी नाहीच!

SCROLL FOR NEXT