मालवणात मुलाखतींतून साहित्याचा जागर
‘कोमसाप’चा पुढाकार; ‘मला भावलेले जयवंत दळवी’ला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १० : येथील नगर वाचन मंदिर आणि कोमसाप शाखा मालवण यांच्यावतीने साहित्यिक कोकणपुत्र जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘मला भावलेले जयवंत दळवी’ हा दळवींच्या साहित्यावर आधारित मुलाखतींचा कार्यक्रम नुकताच ग्रंथालयाच्या सभागृहात झाला.
व्यासपीठावर कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, ज्येष्ठ साहित्यिक माधवराव गावकर, मालवणी कवी रुजारिओ पिंटो, नगर वाचन मंदिरचे कार्यवाह नागेश कदम व ग्रंथपाल संजय शिंदे, आदी उपस्थित होते. मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांना अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी ‘नवचैतन्य’ पुरस्कार दिला. जिल्ह्यातील उद्योन्मुख साहित्यिक आणि कोमसाप मालवणच्या आजीव सदस्यांच्या ‘मला भावलेले जयवंत दळवी’ यावर आधारित मुलाखती सुरेश ठाकूर यांनी घेतल्या. यात वैजयंती करंदीकर यांनी ‘कवडसे’, मधुरा माणगावकर यांनी ‘महानंदा’, नारायण धुरी यांनी ‘अल्बम’, सुगंधा गुरव यांनी ‘कहाणी’, ऋतुजा केळकर यांनी ‘चक्र’, श्रद्धा वाळके ‘सारे प्रवासी घडीचे’, विजयकुमार शिंदे ‘अधांतरी’, माधव गावकर ‘अंधाराच्या पारंब्या’, उज्ज्वला धानजी ‘विक्षिप्त कथा’, शिवराज सावंत ‘महानंदा’, देवयानी आजगावकर ‘कौसल्या’, वैताली चौकेकर ‘स्वगत’ या कादंबरींवर आधारित मुलाखती घेतल्या. श्रृती गोगटे यांनी ‘अतृप्त’, रसिका तेंडोलकर ‘भंडाऱ्याचे हॉटेल’, योगेश मुणगेकर यांनी ‘जळातील मासा’, पूर्वा खाडिलकर ‘सोहळा’, दीपाली कांदळगावकर ‘जळातील मासा’, बंदशेखर धानजी ‘कारभाऱ्याच्या शोधात’, दिव्या परब ‘माजघर’, अमृता मांजरेकर ‘वेचक जयवंत दळवी’, रामचंद बालावलकर यांनी ‘बाकी शिल्लक’, विठ्ठल लाकम ‘मिशी उतरून देईन’ या कथासंग्रहांवर ठाकूर यांनी मुलाखती घेतल्या. सदानंद कांबळी यांनी ‘परममित्र’ ललितलेखावर भाष्य केले. अनघा कदम यांनी ‘संध्याछाया’ नाटकावर भाष्य केले. तेजल ताम्हणकर यांनी ‘सरमिसळ’ या विनोदी कथेवर भाष्य केले. वर्षाराणी अभ्यंकर यांनी ‘बेचक जयवंत दळवी’ या समीक्षा ग्रंथावर भाष्य केले. सुरेश ठाकूर यांनी ‘आत्मचरित्राऐवजी’ या ग्रंथावर भाष्य केले. या मुलाखतींच्या मध्यांतरामध्ये संजय शिंदे यांनी जयवंत दळवींच्या ‘कालचक्र’ नाटकातील एका प्रवेशाचे अभिवाचन केले. नागेश कदम यांना त्यांच्या ‘इये निबंधांचिये नगरी’ या निबंध संग्रहाबद्दल व संजय शिंदे यांना कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल सन्मानित केले. ऋतुजा केळकर, श्रेया चव्हाण, प्रतिभा पेडणेकर, रमाकांत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. सुरेश ठाकूर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.