महायुतीची पोलखोल करण्यासाठी
व्यापक मोहीमः सुरेश बने
‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ नावाने जागृती
संगमेश्वर, ता. ९ ः राज्यात अडीच वर्षांपासून असंवैधानिकपणे सत्तेवर आलेल्या महायुती सरकारतर्फे देदीप्यमान महाराष्ट्राचे खच्चीकरण केले आहे. ते जनतेला समजावे, यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ ही व्यापक मोहीम रत्नागिरी जिल्ह्यात राबवण्यात येणार असल्याची माहिती शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्राला वाचवण्यासाठी हिरावलेला हक्क परत मिळवण्यासाठी एका नव्या जोषाने एकत्र येऊन या महायुती सरकारविरोधात गलथान कारभारांची पोलखोल करायची आहे. यासाठी ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ ही व्यापक मोहीम जिल्हाभर राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्याला हमीभावापासून, पीकविम्यापासून, दुष्काळातील मदतीपासून वंचित ठेवण्याचं काम, दूध उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडर, वीज, प्रवासखर्च, असुविधा, कायदा-सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा, भ्रष्टाचारी कारभाराला उलथवून टाकून जनतेच्या भल्यासाठी सर्वांनी संघटितपणे काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी या अभियानातून जागृती करण्यात येणार असल्याचे बने यांनी सांगितले.
राज्यातील जनतेचा आक्रोश दर्शवणारे ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ हे गीत प्रसारित करण्यात येणार असून, महायुती सरकारविरोधात गलथान कारभाराची पुस्तिका तयार करण्यात आली आहे. यातील जंत्री पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता घरोघरी जाऊन याची माहिती देणार असल्याचे बने यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.