17851
साखरीनाटे बंदराचा होणार कायापालट
१५३ कोटी मंजूर ; बंदरासाठी, जोडरस्त्यासाठीही निधी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः रत्नागिरीतील मिरकरवाडा, राजापुरातील साखरीनाटे व दापोलीत हर्णै ही तीन प्रमुख बंदरे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. मच्छीमारांना ताकद देणारी आहे. त्यामुळे या तिन्ही बंदरांमध्ये मच्छीमार बांधवांना अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध करून देताना या बंदरांचा विकासात्मक कायापालट करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यासाठी शासनाने भरघोस निधीही उपलब्ध करून दिला असून त्यामध्ये साखरीनाटे बंदरासाठी १५३ कोटी रुपयांचा समावेश आहे. त्यातून साखरीनाटे येथे अद्ययावत सोयीसुविधांनीयुक्त बंदर उभे राहणार आहे.
तालुक्यातील साखरीनाटे मत्स्य बंदराच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री सामंत यांच्या झाले. या वेळी सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, शिवसेनेचे राहुल पंडित, अश्फाक हाजू, दीपक नागले, राजू कुरूप, मच्छीमार नेते अमजद बोरकर, शफी वाडकर, तहसीलदार विकास गंबरे, सरंपच गुलजार ठाकूर, सरपंच संदीप बांदकर, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संदीप भुजबळ, मेरीटाईम बोर्डचे कार्यकारी अभियंता मनिष मेतकर आदी उपस्थित होते.
या प्रसंगी मंत्री सामंत यांनी आगामी आराखड्यामध्ये साखरीनाटे बंदराला जोडणाऱ्या जोडरस्त्यासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले. मच्छीमार भगिनींना मच्छी सुकवण्यासाठी दोन्ही ओटे त्यांच्या मागणीनुसार मंजूर केल्याचे जाहीर केले.
सामंत म्हणाले, हर्णै बंदर विकासासाठी २०० कोटी या आधी मंजूर झाले आहेत. आता साखरीनाटे बंदरासाठी १५३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत तसेच मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी दुसऱ्या टप्प्यात शंभर कोटी रुपये देण्यात येतील. कर्नाटक राज्यामधील मल्पी बंदरापेक्षाही सर्व सोयीसुविधेने परिपूर्ण अशी सुंदर बंदरे जिल्ह्यात होतील.
चौकट
जामदा धरण डागडुजीचा निर्णय
गडकिल्ले संवर्धनासाठी ३ कोटी, रस्त्यांसाठी ४ कोटी, मुख्यमंत्री सडक योजनेतून ५० किलोमीटरचे रस्ते राजापुरात मंजूर झाले आहेत तसेच साखरीनाटे बाजारपेठ रस्ता काँक्रिटीकरण, जामदा धरण डागडुजीचा निर्णय घेण्यात आला आहे. मच्छीमारांचा डिझेल कोटा बंद संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.