कोकण

पोलिसपाटील नियुक्ती विरोधात मठकरांचे सिंधुदुर्गनगरीत उपोषण

CD

17859

पोलिसपाटील नियुक्ती विरोधात
मठकरांचे सिंधुदुर्गनगरीत उपोषण

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ ः वेंगुर्ले तालुक्यातील मठ (सतये) पोलिसपाटील पदाची झालेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सुरेंद्र मठकर यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सतयेसाठी पोलिसपाटील पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली होती. या पदासाठी माझ्यासह तिघांनी अर्ज केला होता. तिघांचेही अर्ज वैध ठरल्याने वेंगुर्ले तहसील कार्यालयात लेखी परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल फेब्रुवारीमध्ये लागला. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य असलेल्या एकाची निवड करण्यात आली; परंतु पोलिसपाटील पदासाठी अर्ज करताना ती व्यक्ती राजकीय, संस्थेचे सदस्य, पदाधिकारी अशा कोणत्याही पदावर कार्यरत असू नये. कार्यरत असल्यास पोलिसपाटील पदासाठी अर्ज करू शकणार नाही, असे निर्देश आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. महिला सदस्य या पोलिसपाटील पदासाठी अर्ज दाखल करतेवेळी तसेच अर्जाच्या निवड प्रक्रियेवेळी मठ ग्रामपंचायत सदस्य पदावर कार्यरत होत्या. पोलिसपाटील पदासाठी लेखी परीक्षा झाल्यानंतर त्यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सतये पोलिसपाटील पद बेकायदेशीररित्या भरल्याचे सांगत ही नियुक्ती रद्द करून पात्र उमेदवाराला नियुक्ती द्यावी, या मागणीसाठी आजपासून उपोषणास सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT