17861
नांदगावात शाळा बंद आंदोलन
उर्दू प्राथमिक शाळा ः शिक्षकप्रश्नी पालक आक्रमक
नांदगाव, ता. ९ ः येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळेला वारंवार शिक्षकाची मागणी करूनही शिक्षण विभागाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने पालकांनी आज शाळा बंद आंदोलन केले. जोपर्यंत वाढीव शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नाही. वेळ पडल्यास पंचायत समितीच्या पायऱ्यांवर आंदोलन करू, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अल्लाउद्दीन बोबडे, उपाध्यक्ष यासीन बटवाले, पालकांनी दिला.
येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळेत सध्या ८२ विद्यार्थी शिकत आहेत. मात्र, अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत पालकांनी शिक्षण विभागाकडे वारंवार शिक्षकाची मागणी केली आहे. पत्रव्यवहारही केले आहेत. मात्र, शिक्षण विभागाने कोणतीही दखल घेतली नसल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज शाळा बंद आंदोलन पुकारले. पटसंख्या जास्त असूनही शिक्षक उपलब्ध होत नसेल तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता कोण राखणार? विद्यार्थ्याचे होणारे नुकसान कोण भरून काढणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
दरम्यान, कणकवली पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, केंद्र प्रमुख सद्गुरू कुबल, मुख्याध्यापक मुंगी यांनी आंदोलकांची भेट देत आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती केली. मात्र, जोपर्यंत शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही, अशी भूमिका घेत शाळा बंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे अध्यक्ष बोबडे व पालकांनी सांगितले. नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर, याकुब बटवाले, सर्फराज बटवाले, यास्मीन बटवाले, रजिया सारवान, परहत बटवाले, महम्माद साटविलकर, मोमिना नावळेकर, फातिमा हवालदार, जायदा नावळेकर, शबाना बटवाले, रुक्सार बटवाले, रेश्मा साटविलकर, आरीफा साटविलकर, तम्सिन बोबडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.