कोकण

‘सैनिकांच्या मुलांसाठी अभ्यासक्रमात बदल’

CD

‘सैनिकांच्या मुलांसाठी
अभ्यासक्रमात बदल’
सावंतवाडी ः मालवण-राजकोट येथे पहिल्या पुतळ्यापेक्षा दुप्पट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने पुतळा लवकरच उभारण्यात येणार आहे. याची जबाबदारी जागतिक शिल्पकार सुतार यांना देण्यात आली आहे. परिसरात शंभर कोटी खर्च करून शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे, अशी माहिती वेर्ले येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सैनिकांच्या मुलांना सैन्यात भरती होणे शक्य व्हावे, यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून, त्या माध्यमातून थेट एनडीएमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. लवकरच या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. केसरकर यांनी वेर्ले येथे माजी सैनिकांची भेट घेतली. माजी सैनिकांशी चर्चा करताना त्यांनी ही माहिती दिली. माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना महिला जिल्हा संघटक अ‍ॅड. नीता सावंत-कविटकर, मोहन राऊळ, गोविंद लिंगवत, सदाशिव राऊळ, उल्हास कदम, बाळकृष्ण राऊळ, हनुमंत राणे, चंद्रकांत राणे, सदाशिव कदम, आपा राऊळ, सदा कदम व माजी सैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT