17882
ओटवणे रवळनाथ मंदिराच्या
सभामंडपाचे उद्या लोकार्पण
ओटवणे, ता. ९ ः भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी ओटवणे रवळनाथ मंदिर येथे प्रशस्त मंडप स्वखर्चाने बांधून दिला. दसऱ्याच्या सुवर्ण पर्वणी कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी या मंडपाचे लोकार्पण विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या कामामुळे देवस्थानच्या धार्मिक उत्सवात मंदिर परिसरात मंडपाअभावी होणारी गैरसोय दूर होणार आहे. जागृत देवस्थान व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रवळनाथाच्या दर्शनासाठी व देवस्थानच्या सर्व धार्मिक उत्सवांना भाविकांची अलोट गर्दी असते. मंदिर परिसरात मंडप नसल्यामुळे धार्मिक उत्सवात पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात भाविकांची गैरसोय होते. गेल्यावर्षी विशाल परब या उत्सवाला आले असता देवस्थानच्या मानकऱ्यांनी मंदिर परिसरात मंडप उभारण्याबाबत त्यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी मंडप उभारण्याची ग्वाही दिली होती. रवळनाथ मंदिर नजीकच्या ऐतिहासिक नगारखाना आणि भक्तनिवासाला लागूनच हा प्रशस्त मंडप उभारला आहे. दसऱ्याच्या सुवर्ण पर्वणीला शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी या मंडपाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंडप बांधून दिल्याबद्दल स्थानिक देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रवींद्र गावकर आणि देवस्थानच्या सर्व मानकऱ्यांनी परब यांचे आभार व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.