कोकण

चिपळूण ः ग्रामपंचायत अधिकारीपदाने जबाबदारी वाढली

CD

17869

ग्रामपंचायत अधिकारीपदाने जबाबदारी वाढली
रोहिदास हांगे; चिपळूण तालुका संघटनेची बैठक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः ग्रामपंचायतीला प्रशासकीय प्रमुख म्हणून ग्रामसेवक काम करत आहेत. ग्रामसेवकपद निर्मितीपासूनची वेतन त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी राज्य शासनाकडे वारंवार ग्रामसेवक संघटना करत होती. आता ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे रद्द करून वेतन त्रुटी दुरुस्तीसह ग्रामपंचायत अधिकारी या पदाची निर्मिती करून राज्य सरकारने संघटनेची प्रमुख मागणी पूर्ण केली. यापुढे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर गावच्या शाश्वत विकासाची जबाबदारी वाढली आहे, अशी भावना चिपळूण तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे सचिव रोहिदास हांगे यांनी बैठकीत व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी शासनाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे रद्द करून ग्रामपंचायत अधिकारीपदाची निर्मिती केली. याचबरोबर वेतन त्रुटीची मागणी पूर्ण केली. याबद्दल ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत आनंद व्यक्त करण्यात आला. या वेळी संघटनेचे सचिव रोहिदास हांगे म्हणाले की, माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाची आवश्यकता आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला, हा संदेश भारत स्वातंत्र्यापूर्वीच दिलेला आहे; मात्र गेल्या काही वर्षांत शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले. विविध कारणांनी ग्रामीण भागातील लोकसंख्या कमी होत आहे. त्यामुळे असंख्य समस्या माणसापुढे आज उभ्या राहिल्या आहेत. गावात माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा असून त्यांच्यासह आरोग्य, शिक्षण व रोजगार देण्याची खूप आवश्यकता आहे. त्यासाठी शासन व्यवस्थेतील केंद्रबिंदू असलेली ग्रामपंचायत सक्षम होणे आजच्या काळाची गरज आहे. त्या दृष्टीने शासनस्तरावरून दिवसेंदिवस प्रयत्न होत आहेत. प्रत्येक गावात ग्रामपंचायत अधिकारी कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीच्या सर्व कामाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शासनाने संघटनेची प्रमुख मागणी पूर्ण केल्याने गावच्या विकासातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची जबाबदारीदेखील तितकीच वाढली आहे. त्यामुळे गावविकासासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले. या निमित्ताने संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत, अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

SCROLL FOR NEXT