कोकण

‘के.आर.सी. एम्प्लॉईज’चा निवडणुकीत विजय निश्चित

CD

‘के.आर.सी. एम्प्लॉईज’चा
निवडणुकीत विजय निश्चित

उमेश गाळवणकर ः युनियनला सर्वांची साथ

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः के.आर.सी. एम्प्लॉईज युनियनचा विजय निश्चित आहे, असा विश्वास युनियनचे कार्याध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी व्यक्त केला. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोकण रेल्वे कामगारांची मान्यताप्राप्त युनियनसाठी आज गुप्त मतदान पद्धतीने प्रक्रिया पूर्ण झाली. हे मतदान महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांतील एकूण २२ मतदान केंद्रांवर झाले. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होत असताना ते स्वतंत्र कोकण रेल्वे झोन करून व्हावे, अशी के.आर.सी. युनियनची मागणी असून, या महत्त्वाच्या मुद्द्याला अनुसरून व कोकण रेल्वेच्या ‘मॉनिटायझेशन’चा डाव हाणून पाडण्यात के.आर.सी. युनियनला यश आले. कोकण रेल्वे कामगारांच्या अनेक मागण्या मान्य करून घेण्यात के.आर.सी. एम्प्लॉईज युनियनला आलेल्या यशाच्या आधारे ही निवडणूक लढविली गेली. मागच्या पंधरा दिवसांत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत विविध सभांमधून कामगारांचा पाठिंबा मिळाला आहे. के.आर.सी. एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सुभाष मळगी यांचे नेतृत्व व कोकण रेल्वे एम्प्लॉईज संघाचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर, कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे यांचे नेतृत्व, के.आर.सी.च्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा व एस.सी.एस.टी. असोसिएशनचा पाठिंबा या सर्वांची साथ लक्षात घेता के.आर.सी. एम्प्लॉईज युनियनचा विजय निश्चित असल्याची खात्री आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : सारे काही ‘गॅस’वर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 मार्च 2026

ओझे भयाचे...!

ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट्सचा वापर

स्पर्धा परीक्षांसाठी कोणती शाखा?

SCROLL FOR NEXT