17956
पडेल येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे
सरपंच पोकळे ः आमदार नीतेश राणेंना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ९ ः पडेल (ता.देवगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यात यावे. यामुळे परिसरातील गावांमधील रुग्णांची व्यवस्था होईल, अशी मागणी पडेल सरपंच भूषण पोकळे यांनी आमदार नीतेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
तालुका दौऱ्यावर आलेल्या आमदार राणे यांना आरोग्य सुविधेच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले. यावेळी बाळ खडपे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, भाजप पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, विजयदुर्ग प्रभारी सरपंच रियाज काझी आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पडेल येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात पंचक्रोशीतील रुग्ण उपचारासाठी येतात. या आरोग्य केंद्राला जोडणारी तालुक्यातील विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्ये, पुरळ, वाडा, पडेल, तिर्लोट, सौंदाळे, वाघोटण आदी गावे आहेत. या व्यतिरिक्त राजापूर तालुक्यातील सागवे पंचक्रोशीतील काही गावांसाठी पडेल प्राथमिक आरोग्य केंद्र सोयीचे ठरते. सद्यस्थितीत आरोग्य केंद्रातील गैरसोयींमुळे प्रसुतीसाठी गरोदर महिलांना देवगड येथे जावे लागते. हे अंतर काही गावांना १५ तर काही गावांना ३० किलोमीटर एवढे पडते. ही समस्या दूर होण्यासाठी पडेल येथे ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता आहे. यामुळे पंचक्रोशीतील विजयदुर्ग ते वाघोटणपर्यंतच्या रुग्णांची सोय होईल. त्यामुळे पडेल येथे ग्रामीण रुग्णालय होण्याची मागणी आहे. दरम्यान, याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आमदार राणे यांनी आश्वासित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.