कोकण

मनोरुग्णालय स्थलांतराचा कोणताही प्रस्ताव नाही

CD

मनोरुग्णालय स्थलांतराचा कोणताच प्रस्ताव नाही

उदय सामंत ः ‘ते’ पत्र काढणाऱ्यावर कारवाई करणार, रत्नागिरीकरांच्यात संभ्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : इंग्रजांच्या काळापासून प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरीत सुरू आहे. राज्यामध्ये प्रथम १४ कोटींचा निधीतून ते अद्ययावत करण्यात येणार आहे. ते कोल्हापुरातील जयसिंगपूर-उदगाव येथे हलविण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे हे रुग्णालयात हलविण्याबाबत शासनमान्यतेची अधिसूचना काढणाऱ्यावर १०० टक्के कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
विवेक हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, राज्य शासन स्तरावरून काढण्यात आलेल्या त्या अधिसूचना पत्र आकृतिबंधानुसार मंजूर असलेली पदे उदगाव येधील ३६५ खाटांच्या प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिली. त्यामुळे रत्नागिरीतील मनोरुग्णालय बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. रत्नागिरीतील प्रादेशिक मनोग्णालय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी आहे. रुग्णालयास सुमारे ३६५ खाटांची मंजुरी आहे.
कोल्हापूर, सांगली व सातारा आणि सीमाभागातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मनोरुग्णालयात पुणे किंवा रत्नागिरी येथे जावे लागते. त्यामुळे गेली अनेक वर्षे कोल्हापूरमध्ये मनोरुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे रत्नागिरीच्या धर्तीवर ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोग्णालय स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता असल्याचे अधिसूचना पत्र काढण्यात आले. त्या पत्रामुळे रत्नागिरीत पडसाद उमटले. हे रुग्णालय रत्नागिरीतून हलवू नये अशी मागणी जोर धरू लागली.
स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याबाबत सामंत म्हणाले, रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाचे शासनाकडून मंजूर झालेल्या १४ कोटींचा निधीतून अपग्रेडेशन केले जाणार आहे. त्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले आहे; पण हे मनोरुग्णालय कोल्हापूर येथे स्थलांतरित करण्यात येणार नाही.
---
संघटनांची निदर्शने

अनेक वर्षांपासून रत्नागिरीत असलेले प्रादेशिक मनोरुग्णालय स्थलांतरित होऊ नये यासाठी काही सामाजिक संघटनांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारेवर निदर्शने केली तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रुग्णालय जयसिंगपूरला हलविण्याचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेन्सेन हुआंग यांच्या कमबॅकमुळे अमेरिकी शेअर बाजारात जल्लोश; Nvidiaच्या शेअर्सची मोठी उसळी

Valhe Accident : चिमुकल्यांसमोरच वडिलांवर काळाचा घाला! वाल्हे येथे दुचाकी व चारचाकीचा अपघात; महिला गंभीर जखमी

Relief Hospital Case : रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाकडून फेटाळण्यात आला

Jejuri Accident : चुकीच्या ओव्हरटेकमुळे दोघांचा बळी; जेजुरीतील माऊलीनगर येथे बसची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा मृत्यू

Aizawl No Honking Traffic Discipline : ३ तास ट्रॅफिक जाम, तरीही एकाही गाडीचा हॉर्न नाही! मिझोरामच्या 'या' शहरातील शिस्त पाहून आनंद महिंद्राही थक्क; म्हणाले, "देशाने धडा घ्यावा..."

SCROLL FOR NEXT