कोकण

कोकण रेल्वेला ३०१ कोटींचा निव्वळ नफा

CD

कोकण रेल्वेला ३०१ कोटींचा निव्वळ नफा

आर्थिक वर्षांतील लेखाजोखा ; कर्मचाऱ्याला सानुग्रह अनुदान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने स्थापनेपासूनचा सर्वाधिक निव्वळ नफा २०२३-२४ या आर्थिक वर्षांत मिळवला आहे. २०२३-२४ ला कॉर्पोरेशनला ४७०० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, ३०१ कोटींचा निव्वळ नफा प्राप्त झाल्याची माहिती कोकण रेल्वेच्या ३४व्या स्थापनादिनाच्या सोहळ्यात कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
स्थापना दिवसाचा कार्यक्रम मडगाव येथील रवींद्र भवनात साजरा करण्यात आला. या सोहळ्यावेळी दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार झा, संचालक राजेश भडंग, आर. के. हेगडे उपस्थित होते. या वेळी झा यांनी सांगितले, पेडणे व ओल्ड गोवा येथील बोगद्यासाठी केंद्र सरकारने १५०० कोटी रुपये मंजूर केले असून ते काम लवकरच सुरू होईल. त्यामुळे अनेक समस्या सुटू शकतील. त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या. त्यात त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला १७ हजार ९५१ रुपयांचा सानुग्रह जाहीर केला आहे. कोकण रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक नफा ३०१ कोटी ७५ लाख कमावला आहे. यंदा १,७०० कोटींचे नवीन प्रकल्प राबवले असून त्यात ८५० कोटी विद्युतीकरणासाठी, अभियांत्रिकी कामासाठी ७६९ कोटी, सिग्नल आणि दूरसंचार कामांसाठी ६९ कोटी आणि यांत्रिक कामांसाठी १३ कोटींचा समावेश आहे. विविध विभागांमधील रिक्त जागांवर १९० जणांना नियुक्त्या दिल्या गेल्या आहेत तसेच ट्रॅक मेंटेनन्स, पॉइंट्समन आणि इतर फ्रंटलाइन कामगारांनी कोकण रेल्वे मार्गावर कार्यरत असताना महत्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल रोख पुरस्कार प्रदान केले आहेत. सायबर धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी कोकण रेल्वेने माहिती सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीसाठी ISO २७००१:२०२२ प्रमाणपत्र घेतले आहे. यावर्षी २९ टक्के अधिक पाऊस झाला आहे. परिणामी, पेरनेम बोगद्यातील रूळावर माती साचल्यामुळे आणि नातूवाडी बोगद्याच्या प्रवेशद्वारावर माती घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळित झाली होती. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात आली.
----
आयएसओ प्रमाणपत्र

सहा महिन्यांत कॉर्पोरेशनला १७०० कोटी रुपयांचे प्रकल्प मिळाले शिवाय कॉर्पोरेशनला दर्जा व्यवस्थापन सिस्टिम, आरोग्य व सुरक्षा व्यवस्थापन, पर्यावरणीय व्यवस्थापन, माहितीसाठी आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाले.
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT