कोकण

कुरांगणेतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करा

CD

19412

कुरांगणेतील नुकसानग्रस्त
शेतकऱ्यांचे पंचनामे करा
सरपंच ब्रम्हदंडेः तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १७ः सध्या जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस पडत असून, यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला जात आहे. जिल्ह्यातील भात शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले, त्यांचे तातडीने पंचनामे करा, अशी मागणी कुरांगवणे-बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांनी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिले. कुरांगावणे सरपंच व भाजप कार्यकर्ते ब्रम्हदंडे यांनी कणकवली तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले, अशा सर्व शेतकऱ्यांचे प्रशासनाच्यावतीने तातडीने पंचनामे करून त्या सर्वांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhau Flex Kadha Portal : फ्लेक्सविरोधात पुणेकर सरसावले! ‘भाऊ फ्लेक्स काढा’ पोर्टलवर पहिल्याच दिवशी १५० हून अधिक तक्रारी

नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा ५ राशींसाठी ठरणार लकी! पुढील ६ दिवसांत नोकरी, पैसा अन् व्यवसायात मोठा लाभ

Kaygaon News : ज्ञानोबांच्या भेटीसाठी अमळनेरहून निघाली भक्तीची पायी वारी; टाळ मृदुंगाच्या गजरात आळंदी दिंडीचे प्रस्थान

PCMC Water Crisis : भामा-आसखेड योजनेतून वाढीव पाण्याची प्रतीक्षा; पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची टँकरवरील अवलंबित्वातून सुटका कधी?

Indapur News : भाजप ओबीसी सेलचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार; माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत घोषणा

SCROLL FOR NEXT