कोकण

मुलांच्या मानसिक समस्यांचे उपचार

CD

बालक-पालक ः बहरू आनंदे.............लोगो


मुलांच्या मानसिक समस्यांचे योग्य निदान केल्याने त्यावर योग्य उपाय केले जाऊ शकतात. निदान करताना समस्यांचे विविध पैलू समजून घेणे, कुटुंबाला कुठल्या प्रकारचे उपाय स्वीकार्य आहेत तसेच योग्य उपायांची उपलब्धता या बाबी महत्वाच्या ठरतात. उपाय करताना आधी कुठले उपाय केलेत व त्याचा काही परिणाम झालाय का, हे जाणून घेतले जाते. स्ट्रेस, टेन्शनमुळे होणाऱ्या समस्यांमध्ये शरीर शिथिलीकरण वगळता समुपदेशन व औषधे या दोन मुख्य उपचारपद्धती होय.

- rat१७p१.jpg
24N19446
- श्रुतिका कोतकुंडे
सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण
sajagclinic@gmail.com

----
मुलांच्या मानसिक समस्यांचे उपचार

समुपदेशन ः ताण कमी करणे ः बऱ्याचदा समस्यांचे कारण ताण असतो. पालकांशी बोलून मुलांवरचा ताण कसा कमी करता येईल, शाळेशी बोलून शाळेतला ताण कसा कमी करता येईल तसेच मुलांच्या भावनिक आयुष्यात काही समस्या असेल तर त्याचा ताण कसा कमी करता येईल याचा विचार केला जातो. उदाहरण, म्हणजे मुलांवर परीक्षेचा ताण असल्यास मुलांचे व पालकांचे समुपदेशन करून परीक्षेकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांसाठी वातावरण मैत्रीपूर्ण व आधाराचे करण्याचा प्रयत्न केला जातो.
कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी अर्थात वैचारिक व वर्तणुकीतील बदल
मुलांच्या समस्येच्या मागे बऱ्याचदा चुकीची विचारप्रणाली व गैरसमज तसेच जगाकडे व लोकांकडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन असतो. या गैरसमजांमुळे त्यांच्या भावना उदास, भीती किंवा रागाच्या असू शकतात. घाबरट मुलांमध्ये धोक्याची जाणीव तीव्र असते. नैराश्यातील मुलांमध्ये त्यांना कोणीच पसंत करत नाही, अशी भावना असू शकते. या नकारात्मक दृष्टिकोनामध्ये बदल केल्यास मुलांच्या भावनिक समस्या बऱ्याच कमी होऊ शकतात. याचबरोबर मुलं व पालक अशाप्रकारे का वागतात, याबद्दल समज वाढवणे हेही गरजेचे असते.
वर्तन बदल ः वर्तनातील बदलांमध्ये मुख्यता वर्तनाची चिकित्सा केली जाते की, एखाद्या वर्तनाच्या आधी काय होते व नंतर काय होते. वर्तनाच्या आधीची परिस्थिती किंवा नंतरची परिस्थिती बदलल्यास वर्तन बदलते. नकारात्मक वर्तनाकडे शक्यतोवर कमी लक्ष देण्यावर भर असतो. या उलट चांगल्या वर्तनाचे कौतुक करण्यावर भर असतो. या प्रणालीमध्ये चांगल्या वागण्याचे चांगले परिणाम हे मुलांवर बिंबवण्याचा प्रयत्न असतो, शिक्षा करण्यावर नसतो.
नातेसंबंध सुधार ः कधी कधी समस्यांचे कारण मुलांचे इतर कुटुंबीयांशी असलेले असमाधानी, दुःखी नाते असते. या असमाधानी नात्याच्या मागील कारण मुलाला व इतर कुटुंबीयांना समजून घ्यायला मदत केली जाते तसेच एकमेकांचा दृष्टिकोन समजून घ्यायला मदत केली जाते व नाते फुलवायला मार्गदर्शन केले जाते.
पालक मार्गदर्शन ः शाळेत बरेच विषय शिकवले जात असले तरी पुढील आयुष्यात एक चांगले पालक कसे बनावे, याचे प्रशिक्षण मात्र कधी दिले जात नाही. पालकांची भावनिक साक्षरता वाढवून सकारात्मक भावना कशा व्यक्त कराव्यात व मुलांना योग्य शिस्त कशी लावावी, याचे मार्गदर्शन महत्वाचे ठरते. त्यामुळे मुलांच्या भावनिक व वर्तनातील समस्या कमी होण्यास मदत होते.
समज वाढवणे ः समस्या का उद्भवली? भूतकाळातील घटनांचा आजच्या घटनांवर, वर्तनावर काय परिणाम होत असेल याकडे तटस्थपणे बघितल्याने पालकांना व मुलाला एकमेकांना समजून घेण्यास मदत होते व परस्पर संवाद वाढण्यास मदत होते.
औषधे ः काही तीव्र भावनिक व वर्तनसमस्या वगळता बहुतांशवेळा मुलांना औषधांपेक्षा समुपदेशनाची गरज जास्त असते, हे पालकांनी जाणावे. औषधे ही वर्तन समस्याची धार कमी करण्यास मदत करते व ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. आजच्या गतिमान जगात पालक झटपट उपाय व परिणाम शोधत असतात; पण वास्तवात तसे होत नसते. प्रत्येक मूल वेगळे असते. त्याच्या समस्येचे विविध पैलू समजून त्यावर काम करायला वेळ लागतो. विश्वास आणि संयम ठेवत योग्य मार्गदर्शनाने मुलाचा व पालकांचा भावनिक प्रवास पुन्हा सुरळीत होऊ शकतो, हे जाणावे.

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: २९ वर्षांचा दुष्काळ संपला! एसपी नवनीत काँवत यांच्या नेतृत्वात बीड पोलिसांचा ऐतिहासिक विजय; पटकावली जनरल चॅम्पियनशिप

Mushtaq Ali Trophy: टी20 पदार्पणातच जमशेद आलमचा ऐतिहासिक पराक्रम! चार चेंडूंत चार विकेट घेत रचला इतिहास; सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत नेमकं काय घडलं?

कंत्राट खर्चात तब्बल २४ कोटींची वाढ, पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठा कामाला मंजुरी

Balendra Shah India Visit : नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा भारत दौऱ्यावर, राष्ट्रपती मुर्मू अन् पंतप्रधान मोदींना देणार अनोखी भेट

Harshit Rana Fight: चल निघ! भारत पाकिस्तान सामन्यात भरमैदानात राडा; हर्षित राणा पाकिस्तानी फलंदाजांशी भिडला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT