- rat१७p३.jpg-
२४N१९४४८
रत्नागिरी ः येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात सुरू असलेल्या प्रशिक्षणाचे उद्घाटन करताना सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिनगारे. सोबत अन्य मान्यवर.
`मत्स्यपालन’वर प्रशिक्षण कार्यशाळा
आज समारोप; पाच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामध्ये ‘मत्स्यालय व्यवस्थापन’ या विषयावर तीनदिवसीय प्रशिक्षण सुरू आहे. यामध्ये शोभिवंत मत्स्यपालनातील व्यवसाय संधी यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले जात आहे. याचा समारोप उद्या (ता. १८) होईल.
या कार्यक्रमाचे उद्घाटन बुधवारी (ता. १६) मत्स्य महाविद्यालय शिरगावचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. ई. शिनगारे यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी प्राध्यापक डॉ. केतन चौधरी, डॉ. असिफ पागारकर आणि सहयोगी संशोधन अधिकारी व प्राध्यापक उपस्थित होते. शासकीय योजनांचा लाभ घेऊन यशस्वी उद्योजक बना, असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले तर डॉ. सावंत यांनी शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय हा स्वयंरोजगारकरिता उत्तम पर्याय असल्याचे सांगितले. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. नाईक यांनी प्रशिक्षाणार्थींना मत्स्य व्यवसाय करताना सहकारवृत्तीचा अवलंबन करावा, असे आवाहन केले.
या प्रशिक्षणाला रत्नागिरी, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बार्शी, सोलापूर येथून विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामधील संधी, शोभिवंत माशांची ओळख, पाणी व्यवस्थापन, मत्स्यालय टाकीची बांधणी, शोभिवंत मत्स्यप्रकल्पाचे शास्त्रीयदृष्ट्या बांधकाम, पिल्ले घालणारे मासे तसेच अंडी लावणारे मासे यांच्या विविध प्रजनन पद्धत, शोभिवंत पाणवनस्पतींची ओळख व अभिवृद्धीच्या पद्धती, आवश्यक विविध उपकरणे व साहित्य यांची ओळख, शोभिवंत माशांचे रोग व त्यावरील उपाय, कृत्रिम व जिवंत खाद्याचे प्रकार तयार करण्याच्या पद्धती, प्रकल्पाचे अर्थशास्त्र व प्रकल्प अहवाल तसेच शोभिवंत माशांची काढणी, वाहतूक व विक्री व्यवस्थापन तसेच शासनाच्या विविध अनुदान योजना या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.