- rat१७p७.jpg
P२४N१९४५२
- सावर्डे : रस्त्यावर पडलेले खड्डे.
वालावलकर रुग्णालय ते हडकणी रस्त्यावर खड्डे
बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज; दुतर्फा झाडी
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १७ : सावर्डे परिसरातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या वालावलकर रुग्णालय ते हडकणी या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत तसेच रस्ताही अरूंद आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढली असून, अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सावर्डे येथील बाजारपेठ व वालावलकर रुग्णालय आदींमुळे या रस्त्यावर रिक्षा, दुचाकी, एसटी बस, ट्रक आदी वाहनांची मोठी वाहतूक सुरू असते. शिक्षण व रोजगारानिमित्त हडकणीतील बहुसंख्य मुले, स्त्रिया, पुरुष पायी चालत रुग्णालयाकडे येत असतात. त्यांनाही जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. जिल्हा परिषदेने या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता रूंद करण्याची गरज आहे. समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी, वाहनधारकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दुतर्फा रस्त्यावरील झाडीमुळे समोरून येणारी वाहने सहजरित्या दृष्टीस पडत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची भीती असते. काहीवेळा किरकोळ अपघातही झालेले आहेत. या घटनांमध्ये वाहनांचे नुकसान होत आहे. अनेकवेळा दोन्ही वाहनांना बाजू देण्यावरून वादही झालेले आहेत. मोठी दुर्घटना घडण्याआधी प्रशासनाने या मार्गावरील दुतर्फा वाढलेली झाडे तोडावीत आणि वाहनचालकांना दिलासा द्यावा अशी मागणी हडकणी ग्रामस्थांनी केली आहे.
--------
बाजारपेठ, रुग्णालयाने वर्दळ वाढली
सावर्डे येथील बाजारपेठ आणि वालावलकर रुग्णालय यामुळे या मार्गावर वाहनांची दिवसेंदिवस वर्दळ वाढली आहे. आवश्यक त्या उपाययोजने आभावी या मार्गावर अपघाताचे धोके निर्माण झाले आहेत. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.