कोकण

लोकोपायलट सुनील कीर यांचा विशेष सन्मान

CD

- rat१७p१४.jpg-
२४N१९४८१
गोवा ः लोकोपायलट सुनील कीर यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करताना कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी.

लोकोपायलट सुनील कीर यांचा सन्मान

कोकण रेल्वे; मत्स्यगंधाचा अपघात टाळला

सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १७ ः मत्स्यगंधा एक्स्प्रेसचे इमर्जन्सी ब्रेक ऑपरेट करून संभाव्य अपघात टाळल्याबद्दल कोकण रेल्वेमध्ये कार्यरत असलेले कोंडगाव-साखरपामधील लोकोपायलट सुनील कीर यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गोवा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा गौरव झाला.
कोकण लोकोपायलट सुनील कीर हे लोकोपायलट असून, २९ सप्टेंबर २०२३ ला कोकण रेल्वेमार्गवरील मत्स्यगंधा एक्स्प्रेसवर सेवा बजावत होते. रत्नागिरी ते मडगाव या प्रवासादरम्यान रूळावर नारळाचे झाड कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आले. लोकोमोटिव्ह पायलट सुनील कीर आणि त्यांचा सहकारी निमिष कदम यांनी प्रसंगावधान राखत अत्यावश्यक (इमर्जन्सी) ब्रेक कार्यरत केले. त्यामुळे रेल्वे थांबली आणि संभाव्य अपघातापासून अनेकांचे प्राण वाचले. त्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल कोकण रेल्वेचे चेअरमन संतोषकुमार झा यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. कीर हे मूळचे साखरपा गावातील असून, १९९२ मध्ये ते कोकण रेल्वेत चालक म्हणून रूजू झाले. त्यानंतर २००६ ला असिस्टंट लोकोपायलट आणि त्यानंतर २०१६ मध्ये लोकोपायलट म्हणून पदोन्नती मिळाली. पुढे त्यांना ए ग्रेड बढती देण्यात आली. कीर यांनी यापूर्वीही असे पुरस्कार मिळवले आहेत. त्यांना १९९८, २०१४, २०१८ मध्ये सुद्धा हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यंदाचा हा त्यांचा चौथा पुरस्कार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांच्यावर पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप; 'एसीबी'नेच माहिती लीक केल्याचा तक्रारदाराला संशय

Gold Silver Rate India : शेअर बाजार ओपन होताच सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जानेवारी २०२७ पर्यंत सोने एक लाखांच्या आत येणार?

IPL 2027 Auction Player Register List: १२२० खेळाडूंनी नोंदवली नावं... त्यात १२ बांगलादेशी; भारताचे दोनच खेळाडू २ कोटींच्या यादीत, कोण आहे ते?

Latest Marathi News Live Update : समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, ६ प्रवासी जखमी

Farmer ID Registration : शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी नसेल तर सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही? मोबाईलवरून असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT