कोकण

शाळा व्यवस्थापन समितीला

CD

‘शाळा व्यवस्थापन’ला
पोषण आहाराचे अधिकार

बचतगट, संस्थाच्या मनमानीला चाप ; निवडीचे स्वातंत्र्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः शहरी भागातील शाळेत विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे तयार आहाराचा पुरवठा करण्यासाठी महिला बचतगट, संस्थांची निवड करण्याचे अधिकार यापुढे संबंधित शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळांना न जुमानणाऱ्या काही बचतगट, संस्थांच्या मनमानीला चाप बसला आहे.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत शहरातील शाळांमध्ये धान्य साठवण्यास तसेच स्वयंपाकगृहासाठी जागा उपलब्ध नाही. अशा शाळांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहार पुरवठा करण्यात येतो. त्यासाठी महापालिका व नगर पालिका शिक्षण मंडळ प्रशासनामार्फत अर्ज मागवून महिला बचतगट, संस्थांची निवड करण्यात आली होती; मात्र आहार पुरवठादार बचतगट संस्थांबाबत शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे शासनाने सुधारित निर्णय घेतला आहे. नागरी भागात शाळेतील विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे तयार आहाराचा पुरवठा करण्यासाठी महिला बचतगट, संस्थांची निवड करण्याचे अधिकार यापुढे संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात येत असल्याचा शासननिर्णय १४ ऑक्टोबरला काढण्यात आला आहे. प्रतिदिन प्रतिविद्यार्थी निर्धारित केलेला तांदूळ व आहार खर्चाची रक्कम आता शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीस देण्यास येईल. नियुक्त बचतगट, संस्था यांनी शासनाने निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देणे आवश्यक राहणार आहे.
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher suspended : बोगस दिव्यांग प्रमाणपत्रप्रकरणी पाच शिक्षक निलंबित; पूर्वी १८ ते ६० टक्के अपंगत्वाची नोंद; फेरतपासणीत शून्य ते १० टक्के प्रमाण

China Surveillance: ऑपरेशन सिंदूरदरम्यान चिनी उपग्रहांकडून टेहळणी; भारतातील कोणत्या लष्करी तळांवर होती नजर?

Latest Marathi News Live Update : मी सुरक्षित आहे, प्रसारित होत असलेल्या बातम्या खोट्या - जय पवार

WTC 2025-27: दक्षिण आफ्रिकेचं फायनलचं तिकीट जवळपास पक्कं! दुसऱ्या स्थानासाठी भारतासह ३ बलाढ्य संघांमध्ये चुरस

मराठी नृत्यनाट्याच्या प्रेमात पडले पंकज त्रिपाठी; ‘एक तिची गोष्ट’ पाहून कलाकारांना दिली खास दाद

SCROLL FOR NEXT