कोकण

वैचारिक स्वच्छतेसाठी वाचन आवश्यक

CD

19486

वैचारिक स्वच्छतेसाठी वाचन आवश्यक
वैशाली पंडितः भंडारी हायस्कूलमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १७ : वाचनाची आवड ही वाचल्याशिवाय कळत नाही. आज किती जणांच्या घरी वाचनासाठी पुस्तके आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. आजची शिक्षण पद्धती ही गुणांवर आधारित आहे. त्यापलीकडे जाऊन मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे. आपले विचार स्वच्छ करण्यासाठी वाचनाची गरज आहे, असे प्रतिपादन येथील ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यांनी येथे केले.
येथील भंडारी ए. सो. हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये भारतरत्न ''मिसाईल मॅन'' डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सिंधुदुर्गातील ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर तसेच संस्थेचे लोकल कमिटी सचिव दशरथ कवटकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, संजना सारंग, पूजा कुडाळकर, मनीषा इंगळे, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते. प्रारंभी श्रीमती कुडाळकर यांनी प्रास्ताविक केले. परिचय सारंग यांनी करून दिला.
पंडित म्हणाल्या, "आज वाचनाची चळवळ निर्माण झाली पाहिजे, हे म्हणणेच एक शोकांतिका आहे. मुले वाचत नाहीत म्हणून त्यांना दोष देऊन उपयोग नाही, तर मुळात आपण का बदलत गेलो, आपणच कमी वाचायला का लागलो0 याचा विचार आपल्या पिढीने केला पाहिजे. मुलांना वाचनाकडे वळविण्यासाठी आपण काय करतो, हे महत्त्वाचे आहे. ''वाचाल तर वाचाल'' हा सुविचार केवळ म्हणून उपयोग नाही, तर आपल्याला कशापासून वाचायचे आहे, हे समजून घेतल्यास वाचनाचे महत्त्व आपल्याला समजेल. वाचनाची चळवळ हे केवळ बोलण्यापुरते न ठेवता या चळवळीत सहभागी झाले पाहिजे."
यावेळी वैशाली पंडित यांचा चेअरमन सुधीर हेरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रंथालयाची सर्वाधिक पुस्तके वाचणारी विद्यार्थिनीं सानिका चव्हाण व विद्यार्थी आदित्य चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Auto Rickshaw Strike : राज्यात आज रिक्षांचा संप; मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरांतील प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता

INDA vs PAKA सामन्यात राडे! वैभवला डिवचलं, हर्षित राणालाही आक्रमक सेंडऑफ, तर तिलकशीही पाकिस्तानी खेळाडू भिडले; Viral Video

Crop Insurance: रब्बीच्या सहा पिकांना विमा ,कांद्याला हेक्टरी ९५ हजार, ज्वारीला ३६ हजारांची भरपाई

Satara News: अजूनही कागदावरच ४० रुपयांत नाश्ता; एसटीच्‍या योजनेची सहा महिन्यांपूर्वी घोषणा; स्वच्छतागृहांचाही बोजवारा

Maharashtra Cold Wave : महाराष्ट्रात गुलाबी थंडीचा जोर वाढला; जळगावमध्ये नीचांकी तापमानाची नोंद, पुढील ३ दिवस कसे राहणार हवामान?

SCROLL FOR NEXT