19490
वेंगुर्लेकर महाविद्यालयात
वाचन प्रेरणा दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ः पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय ग्रंथालय विभागाद्वारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती तथा ''वाचन प्रेरणा दिन'' महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक प्रा. श्रुती कोदे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यानिमित्त घेण्यात आलेल्या ''प्रकट वाचन'' स्पर्धेत एकूण १७ विद्यार्थी सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रुती कोदे व ग्रंथपाल सुशांत वालावलकर यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ग्रंथालय समितीच्या सदस्या प्रा. स्मिता परब, प्रा. तन्वी सिंघन, प्रा. हर्षदा लातये, प्रा. प्रांजना पारकर, प्रा. प्रथमेश गोसावी तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रा. प्रांजना पारकर यांनी डॉ. कलाम यांच्या जीवन व कार्याचा आढावा घेत प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. स्पर्धेत हसरी चव्हाण, तन्वी मेस्त्री व नितीन रावले, निकिता पांचाळ, विराज नाईक यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविला. परीक्षक म्हणून प्रा. श्रुती कोदे व प्रा. स्मिता परब यांनी काम पाहिले. विजेत्यांचे सर्वांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी चिंदरकर हिने केले. सायली परब हिने आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.