कोकण

पाणी गुणवत्तेची माहिती मिळणार एका क्लिकवर

CD

पाणी गुणवत्तेची माहिती एका ‘क्लिक’वर

जिल्हा परिषद ; संकेतस्थळ अद्ययावत करण्याचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी दूषित असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून प्राप्त होत होत्या. यावर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने नागरिकांना पाण्याची गुणवत्ता समजण्यासाठी संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पाणी गुणवत्ताविषयक रासायनिक व जैविक तपासणीचे अहवाल आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.
शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. महिन्यातून एकदा जिल्हा परिषदेच्या आरोग्य व पाणी स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यातील जलस्रोतांची अणुजैविक तपासणी करण्यात येते. तपासणीअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक जलस्रोताचे दर महिन्याला जलसुरक्षा रक्षकामार्फत पाणी नमुने गोळा करून ते तपासणीकरिता जिल्हा प्रयोगशाळेत पाठवले जातात. जिल्हा प्रयोगशाळेत पाणी नमुन्यांची तपासणी केल्यानंतर दूषित नमुन्याचा आरोग्य विभागाला अहवाल दिला जातो. दूषित जलस्रोतांचे आरोग्य विभागामार्फत शुद्धीकरण करून पुन्हा तपासणी केली जाते. या अंतर्गत होणारे अहवाल आता शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. वर्षभरापूर्वीचेदेखील अहवाल या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे पाणी तपासणी अहवाल संबंधित जलसुरक्षकाच्या ई-मेलवरसुद्धा पाठवण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सध्या पाणी व स्वच्छता मिशनतर्फे पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT