- rat१७p२३.jpg-
P२४N१९५०३
गोळवली ः येथे होणाऱ्या गोळवलकर गुरूजींच्या स्मृती केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन करताना भैय्याजी जोशी सोबत अन्य मान्यवर.
गोळवलीत गोळवलकर गुरूजींचे स्मृती केंद्र
भैय्याजी जोशी ः जागतिक स्तरावर नावलौकिक
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १७ ः जागतिक पातळीवर परमपूज्य गोळवलकर गुरूजींनी गोळवलीसह देशाचा आणि स्वतःचा नावलौकिक केला आहे. गोळवली गावात होत असलेल्या सुसज्ज अशा गोळवलकर गुरूजींच्या स्मृती केंद्राला प्रत्येकजण भेट देतील. त्यामुळे गोळवलकर गुरूजींच्या स्मृतीला कायमस्वरूपी उजाळा मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश तथा भैय्याजी जोशी यांनी केले.
तालुक्यातील गोळवली येथील गोळवलकर गुरूजी स्मृती केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी जोशी म्हणाले, गावामुळे जशी व्यक्ती मोठी होते तसेच व्यक्तीच्या कर्तृत्वामुळे गाव मोठा होतो. आपली अफाट बुद्धिमत्ता, अविस्मरणीय कर्तृत्व, निःस्वार्थी जनसेवा करून संपूर्ण जगात परमपूज्य गोळवलकर गुरूजींनी गावाचे त्याचप्रमाणे देशाचे आणि आपले नाव लौकिक केले. यापुढे गोळवलीत सुसज्ज होणाऱ्या गुरूजींच्या स्मृती केंद्रास भेट देणारे गुरूजींच्या स्मृतीस कायमस्वरूपी उजाळा देण्याचे काम करतील. यासाठी ग्रामविकास प्रकल्पाच्या पंचक्रोशीतील सर्वांचे खूप मोठे सहकार्य मिळत आहे. या प्रकल्पाचे व्यवस्थापक देशपांडे उभयतांनी आपल्या कार्यकौशल्याने खूप मोठा जनसंपर्क वाढवल्यामुळे ग्रामविकास होत आहे.
भूमिपूजन झालेल्या स्मृती केंद्राच्या इमारतीची माहिती प्रोजेक्टरवरून उपस्थितांना देण्यात आली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ॲड. प्रशांत पाध्ये यांनी केले. त्यानंतर प्रकल्पाचे व्यवस्थापक शेखर देशपांडे यांनी मागील १७ वर्षे प्रकल्पावर काम करताना मिळालेले सहकार्य, राबवलेले उपक्रम या विषयी माहिती दिली. या प्रसंगी गोळवलीच्या सरपंचा शालिनी पतये, गावकर दत्ताराम दुदम, दत्ताराम सोलकर, संतोष पावरी, अॅड. प्रशांत पाध्ये, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.