कोकण

निकाल ठरवणार सत्ता महत्वाची की निष्ठा!

CD

मतदार ठरवणार सत्ता की निष्ठा!

जिल्ह्यातील स्थिती; शिवसेना आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ : मागील तीन वर्षात शिवसेना फुटली, पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. त्याचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यात उमटले. सत्ता आणि मतदार संघाच्या विकासासाठी तीन आमदारांनी पक्षप्रमुखांना सोडले आणि सत्तेत सामील झाले; मात्र दोन आमदार पक्षप्रमुखांबरोबर कायम राहिले. मतदारांच्यादृष्टीने सत्ता महत्वाची की, निष्ठा याचा निकाल या निवडणुकीत होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच होणार आहे. महायुतीत भाजपने पाचपैकी चार जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर एक जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडली आहे. गुहागरची जागा मिळावी म्हणून भाजपचे स्थानिक कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. ती मिळाली नाही तर महायुतीमध्ये भाजपची पाटी जिल्ह्यात कोरी राहील. महाविकास आघाडीमध्ये पाचपैकी चार जागा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तर एक जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. त्यामुळे काँग्रेसची पाटी जिल्ह्यात कोरी राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत कोकणात महाविकास आघाडीची पिछेहाट झाली; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या आहेत. लोकसभेला मिळालेली मते आणि विधानसभेचे गणित यांचा कधीच मेळ घालता येत नाही. लोकसभेला १२ ते १३ लाखांचा मतदार संघ होता. विधानसभेला हेच मतदान अगदी दीड ते तीन लाखांपर्यंत आलेले आहे. जेवढे मतदान कमी तेवढा धोका अधिक आहे. जातीपातीचे राजकारण, फाटाफूट आणि नाराजी यामुळे अडचणी वाढल्या आहेत. महायुतीने विविध योजनांचा आणि विकासकामांचा धडाका लावत लोकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीने पक्षफुटीचा मुद्दा प्रचारात आणला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पक्षाचा खरा मालक कोण आणि चिन्ह कोणाचे? याचा निर्णय होण्यासाठी दोन्ही पक्षप्रमुखांनी कोर्टात धाव घेतली; मात्र हा निर्णय कोर्टाने दिला नाही. त्यामुळे हा निर्णय आता २० नोव्हेंबरला जनतेच्या कोर्टात होईल, असा प्रचार सुरू झाला आहे.
-----
दृष्टिक्षेपात...
* २०१९ ला शिवसेना-भाजप विरूद्ध राष्ट्रवादी-काँग्रेस अशी पारंपरिक समीकरणे होती.
* निवडणूक निकालानंतर शिवसेनेने भाजपशी नाते तोडले आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली.
* जिल्ह्यातील सर्व आमदार सत्ताधारी महाविकास आघाडीतील होते.
* २०२१ ला एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत शिवसेना ताब्यात घेतली आणि भाजपशी युती केली.
* अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी आपल्याकडे घेत भाजपला साथ दिली.
-------
कोट १

कोणी कितीही विकासकामे केली, वेगवेगळी आमिषे दाखवली तरीही मतदार ज्यांना निवडून द्यायचे त्यांनाच देतात. सोशल मीडियामुळे लोकं खूप हुशार झाली आहेत. काय चांगले आणि काय वाईट हे समजते. मतदारांनी धक्कादायक कौल दिला तर त्याचे आश्चर्य वाटायला नको.

- शौकत मुकादम, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
....
विद्यमान आमदार
* रत्नागिरी ः उदय सामंत (शिंदे शिवसेना)
* राजापूर ः राजन साळवी (ठाकरे शिवसेना)
* गुहागर ः भास्कर जाधव (ठाकरे शिवसेना)
* दापोली ः योगेश कदम (शिंदे शिवसेना)
* चिपळूण ः शेखर निकम (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेन्सेन हुआंग यांच्या कमबॅकमुळे अमेरिकी शेअर बाजारात जल्लोश; Nvidiaच्या शेअर्सची मोठी उसळी

Valhe Accident : चिमुकल्यांसमोरच वडिलांवर काळाचा घाला! वाल्हे येथे दुचाकी व चारचाकीचा अपघात; महिला गंभीर जखमी

Relief Hospital Case : रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाकडून फेटाळण्यात आला

Jejuri Accident : चुकीच्या ओव्हरटेकमुळे दोघांचा बळी; जेजुरीतील माऊलीनगर येथे बसची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा मृत्यू

Aizawl No Honking Traffic Discipline : ३ तास ट्रॅफिक जाम, तरीही एकाही गाडीचा हॉर्न नाही! मिझोरामच्या 'या' शहरातील शिस्त पाहून आनंद महिंद्राही थक्क; म्हणाले, "देशाने धडा घ्यावा..."

SCROLL FOR NEXT