19517
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत
तळेरे महाविद्यालयाचे यश
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १७ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग व क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळेरेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा कासार्डे हायस्कूल, कासार्डे येथे पार पडल्या.
यावेळी १७ वर्षांखालील मुले/मुली या गटात अवधूत तळेकर-१०० मीटर धावणे द्वितीय, प्रशिक कदम२०० मीटर धावणे व लांब उडी तृतीय क्रमांक, प्रसन्न तळेकर-४०० मीटर धावणे प्रथम, अनुष्का टक्के-४०० मीटर धावणे द्वितीय, चैतन्या पवार-२०० मीटर धावणे तृतीय, साहिल पवार-८०० मीटर धावणे तृतीय, गणेश माने-गोळा फेक प्रथम, प्रशिक कदम, अवधूत तळेकर, साहिल पवार, प्रसन्न तळेकर-४×१०० मीटर रिले प्रथम. तसेच १९ वर्षांखालील मुले/मुली गटात तनश्री दुधवडकर-२०० मीटर धावणे द्वितीय, लक्षण नांदगावकर-भालाफेक द्वितीय क्रमांक. प्रशालेचे क्रीडाशिक्षक एन. बी. तडवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळा समिती अध्यक्ष अरविंद महाडिक, सर्व शाळा समिती सदस्य, प्रा. अविनाश मांजरेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.