१९५३२
मैदानी क्रीडा स्पर्धेत
किंजल अदम प्रथम
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १७ ः जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत जामसंडे येथील श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिर या प्रशालेची विद्यार्थीनी किंजल अदम हिने १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. आता शनिवारी (ता.१९) डेरवण (चिपळूण) येथे होणार्या विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अॅड. अजित गोगटे यांनी ५०० रूपयाचे प्रोत्साहनपर बक्षीस तिला दिले. यावेळी सुनील जाधव, मृत्युंजय मुणगेकर आदी शिक्षक उपस्थित होते. किंजल हिला समीरा राऊत, संजीवनी जाधव, मृत्युंजय मुणगेकर, पराग हिरनाईक, मोहन सनगाळे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल संस्था पदाधिकारी यांच्यासह मुख्याध्यापक संजय गोगटे आदींनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.