- rat१७p५.jpg
२४N१९४५०
- आर्य भाटकर
आर्य भाटकरची
जिल्हा संघात निवड
दापोली ः ः महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनतर्फे जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघात दापोलीच्या आर्य भाटकर याची निवड झाली आहे. आर्य दापोलीतील लेदर बॉल क्रिकेट असोसिएशनतर्फे किक्रेट खेळतो. त्याच्या निवडीबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष अनिकेत भाटकर, उपाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सचिव राम जागडे, सहसचिव सुशांत सावंत, खजिनदार संदीप बर्वे, सहखजिनदार कादीर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
----
गरबा नृत्य स्पर्धेत
नेहा गवाणकर प्रथम
साडवली ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित गरबा नृत्य स्पर्धेत ९ गटांनी सहभाग घेतला होता. सांघिक गरबा नृत्य स्पर्धेत नेहा गवाणकर आणि सहकारी (११वी वाणिज्य), प्राजक्ता गुरव आणि सहकारी (१२वी कला), वैष्णवी पाताडे आणि सहकारी (१२ वाणिज्य-ब), साक्षी हतपले आणि सहकारी (१२ वी संयुक्त), अपूर्वा भोसले आणि सहकारी (११ वी कला) यांनी यश मिळवले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देवयानी जोशी यांनी केले तसेच प्रा. जोशी यांनी नवरात्रोत्सवातील आयोजित स्पर्धा व उपक्रमांचा आढावा घेतला. उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना दिला जाणारा सन्मान, भारतातील प्रत्येक सण व उत्सवातील स्त्रियांचा असणारा महत्वाचा सहभाग व समाजाकडून मिळणारा आदर या विषयी सविस्तर विवेचन केले. स्पर्धेच्या परीक्षक सानिका सावंत यांनी काम पाहिले.
----
पावसासह भातशेतीला
रानडुक्करांचा त्रास
साडवली : संगमेश्वर तालुक्यात सध्या जोरदार पाऊस पडत असून, भातशेतीला मोठा तडाखा बसला आहे. भातशेती आडवी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. संगमेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातक्षेत्र आहे. भातशेती कापणीयोग्य झाली असून, शेतकरी पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करत आहेत. गेले अनेक दिवस पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे रात्रीच्यावेळी जंगली प्राण्यांचा होत असलेला त्रास यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.