19537
भोसले इंटरनॅशनल स्कूलचे
राजभाषा हिंदी परीक्षेत यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ः महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था आयोजित अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. परीक्षेला पहिली ते दहावीतील एकूण १५० विद्यार्थी बसले होते.
यापैकी दुसरीतील अयान डिसोजा, चौथीतील अर्णा सावंत आणि नववीतील वरदा केरकर यांनी ''अ'' श्रेणीत उत्तीर्ण होत राष्ट्रीय राजभाषा हिंदी प्रतिभा पुरस्कार प्राप्त केला. एकूण विद्यार्थ्यांपैकी १४४ विद्यार्थी प्रथम तर ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये झाले. विद्यार्थ्यांना शाळेच्या हिंदी शिक्षिका प्राची कुडतरकर, रसिका कंगराळकर व महादेवी मलगर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले व मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.