19541
ऑप्टिकल वेलफेअर असोसिएशन
जिल्हाध्यक्षपदी अनिल सावंत
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ः ऑप्टिकल वेलफेअर असोसिएशन, सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी वेतोरे नमसवाडी येथील अनिल सावंत, सचिवपदी मंगेश चव्हाण तर खजिनदार म्हणून शक्ती देसाई यांची निवड कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली. संस्थेतर्फे रविवारी (ता. २०) कुडाळ येथे स्नेहसंमेलन व कार्यशाळा आयोजित केली आहे.
अन्य कार्यकारिणीत उपाध्यक्ष अभयसिंह रावराणे, सहसचिव प्रवीण बागवे, सहखजिनदार संतोष बांबुळकर, सल्लागार अरुण परब, सदस्य रघुवीर सावंत, सहदेव हडकर, नामदेव साटम, बापू राणे यांचा समावेश आहे. असोसिशनचा रविवारी सकाळी १० ते ६ या वेळेत येथील मराठा हॉल येथे स्नेहमेळावा होणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते कोल्हापूर ऑप्टिकल वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अली यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी संतोष नाईक, प्रसाद पारकर, प्रकाश तेंडुलकर, सीताराम कुडतरकर, सुहास पाटील, स्वप्नील आष्टेकर, सागर साळुंखे, दिग्विजय पाटील, नितीन वाळके, सुधीर धुरी, श्रीराम शिरसाट, अर्जुन परब आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर यांची उपस्थिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.