दसऱ्याच्या मुहुर्तावर १ कोटी १५ लाखांचा महसूल
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ; एका दिवसात १४८ वाहनांची खरेदी
राजेश शेळके ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीला अर्थात दसऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. यंदा दसऱ्याच्या (ता. १२) मुहुर्तावर जिल्ह्यात १४८ जणांनी वाहने खरेदी केली तर आठवडाभरात ७८० वाहनांची खरेदी झाली. एकूण ९२८ वाहनांची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) कार्यालयात झाली. यामधून आरटीओला १ कोटी १५ लाख ७९ हजार ३८८ रुपये महसूल मिळाला आहे.
बदलत्या काळानुसार लोकांच्या राहणीमानातही बदल होत आहे. त्यामुळे वाहनखरेदीकडील कल दिवसेंदिवस वाढत आहे. बँकांसह खासगी फायनान्स कंपन्यांकडून १०० टक्के कर्ज प्रकरण होत असल्यामुळे आलिशान आणि विविध कंपन्यांच्या वाहनांची खरेदी होत आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर जिल्ह्यात अनेकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या नोंदणीनुसार, जिल्ह्यात शनिवारी (ता. १२) दसऱ्याच्या एका दिवसात १४८ वाहनांची खरेदी झाली. त्यामध्ये दुचाकी ८२, मोटार कार ३३, रिक्षा १५, गुड्स कॅरिअर वाहने १८ या वाहनांचा समावेश आहे तर ६ ते १२ ऑक्टोबर या एका आठवड्यात ७८९ वाहनांची खरेदी झाली आहे. या वाहनांची आरटीओ कार्यालयात नोंदणी झाल्यानंतर कराच्या रूपाने आरटीओ कार्यालयाला १ कोटी १५ लाख ७९ हजार ३८८ रुपये महसूल मिळाला आहे. वाहन खरेदीमधून प्रत्यक्ष आर्थिक उलाढाल सुमारे १० कोटीहून अधिक झाल्याचा अंदाज आहे. रत्नागिरीत विविध कंपन्यांची शोरूम आहेत. या एजन्सींच्या माध्यमातून महिन्याला ३० ते ४५ च्या दरम्यान वाहनांची विक्री होत असल्याची माहिती कंपन्यांनी दिली.
-------
चौकट...
आठवड्यात खरेदी केलेली वाहने
दुचाकी - ५३२
मोपेड - १
मोटार - १४५
रिक्षा - ३०
रिक्षा टेम्पो - ८
गुड्स कॅरिअर वाहने - ५८
बस -१
अॅम्बुलन्स -१
डंपर - ४
---
कोट...
दसऱ्याच्या मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी होते. त्यानुसार आरटीओ कार्यालयाला खरेदी झालेल्या वाहनांची नोंदणी झाली असून, कराच्या स्वरूपात महसूल मिळाला.
- अजित ताम्हणकर, सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.