कोकण

फुटबॉल स्पर्धेत ''बांदा नाबर''चे वर्चस्व

CD

19571

फुटबॉल स्पर्धेत ‘बांदा नाबर’चे वर्चस्व
आंबोलीतील शालेय स्पर्धाः १४, १७ वर्षे वयोगटांत विजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १७ः आंबोली येथील सैनिक स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या पी. एफ. डॉन्टस तालुकास्तरीय फुटबॉल लीगमध्ये येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ व १७ वर्षे वयोगटातील मुलांचा फुटबॉल संघ विजेता ठरला.
स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या अंतिम सामन्यात संघातील हर्ष हुमरसकर याने गोल करून दिव्य ज्योती शाळेचा १-० ने पराभव करत विजेतेपद मिळविले. या संघात कर्णधार दर्शिल राऊळ, गोविंद गावकर, वेदांत गवस, रितेश धामापूर, सुयश गावकर, अमृत पेंडूरकर, दत्ताराम भिसे, शशिकांत धुरी, साईश वेंगुर्लेकर, प्रसाद गवस, समर्थ कामत, मितेश मयेकर, रिदान खतीब, ओम गावकर यांचा समावेश होता. तसेच १४ वर्षांखालील संघात कर्णधार सोहम सातार्डेकर, प्रणय नाईक, संस्कार शिरोडकर, तेजस गावकर, रामा मालवणकर, ऋतुराज नाईक, आधिराज गवळे, शुभम शिरोडकर, दुर्वांग मालवणकर, साईराज पेडणेकर, पार्थ सुतार, भागवत सारंग यांनी उत्कृष्ट खेळाचे केला. चौदा वर्षे वयोगटातील मुलांच्या अंतिम सामन्यात संघातील तेजस गावकर, पार्थ सुतार, ऋतुराज नाईक यांनी गोल करून सेंट झेवियर्स स्कूल आजगाव यांचा पॅनेल्टीवर ३-० ने पराभव करत विजेतेपद मिळविले.
या स्पर्धेत १७ वयोगटातील गोविंद गावकर तसेच सोहम सातार्डेकर यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. या दोन्ही संघांना शाळेचे क्रीड़ाशिक्षक प्रशांत देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, संस्थेचे मंगेश कामत, योगेश्वर पाडलोस्कर, त्रिविक्रम उपाध्ये, बालेंद्र सतरकर व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष दौलतराव देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांच्यावर पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप; 'एसीबी'नेच माहिती लीक केल्याचा तक्रारदाराला संशय

Gold Silver Rate India : शेअर बाजार ओपन होताच सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जानेवारी २०२७ पर्यंत सोने एक लाखांच्या आत येणार?

IPL 2027 Auction Player Register List: १२२० खेळाडूंनी नोंदवली नावं... त्यात १२ बांगलादेशी; भारताचे दोनच खेळाडू २ कोटींच्या यादीत, कोण आहे ते?

Latest Marathi News Live Update : समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, ६ प्रवासी जखमी

Farmer ID Registration : शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी नसेल तर सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही? मोबाईलवरून असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT