गाळेलमध्ये तरुणाची
गळफासाने आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १७ ः गाळेल आवळ्याचे भरड येथील महम्मद जयदे शिवराम बांदेकर (वय ३१) या तरुणाने बुधवारी (ता. १६) गळफास घेऊन आत्महत्या केली. घराच्या मागच्या बाजूला असलेल्या काजूच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. याबाबत गाळेल पोलिसपाटील चंद्रकांत जयराम बांदेकर यांनी बांदा पोलिसांत खबर दिली.
याबाबत बांदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गाळेल आवळ्याचे भरड येथे महम्मद जयदे शिवराम बांदेकर हा युवक आपल्या परिवारासह राहत होता. त्याच्यासोबत पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई राहत होती. पत्नीची परीक्षा असल्याने ती आपल्या बेळगाव येथे माहेरी गेली होती. दरम्यान, मंगळवारी (ता. १५) रात्री अकराच्या सुमारास पत्नी सोबत त्याचे फोनवर बोलणे सुद्धा झाले होते. बुधवारी सकाळी तो आपल्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या काजूच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची माहिती स्थानिक पोलिसपाटील यांनी बांदा पोलिसांत दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.