19595
वाळू नेणाऱ्या डंपरवर
रामगडमध्ये कारवाई
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १७ः रामगड येथे वाळू वाहतूक करणारा डंपर (क्र. एमएच ०७ एजे १७१२) गौण खनिज वाहतूक विरोधी पथकाने पकडला. ही कारवाई मंगळवारी (ता. १५) रात्री सव्वा नऊच्या सुमारास करण्यात आली. या डंपरमधून सुमारे तीन ब्रास वाळू वाहतूक केली जात होती. डंपरचालकाकडे पथकाने परवान्याची मागणी केली असता आढळून आला नाही. त्यामुळे डंपर ताब्यात घेऊन आचरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
यावेळी आचरा तलाठी संतोष जाधव, असरोंडी तलाठी काटे, त्रिंबक तलाठी रविराज शेजवल, पोलिस हवालदार तुकाराम पडवळ, पोलिसपाटील सुनील खरात आदींनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.