राजापुरात रविवारी राज्यस्तरीय काव्य संमेलन
मराठी साहित्य मंडळ : जीवनगौरव पुरस्काराने डॉ. तारा भवाळकर यांचा सन्मान करणार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ : मराठी साहित्य मंडळाच्या वतीने राजापूरमध्ये रविवारी (ता. २०) राज्यस्तरीय काव्यसंमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले जीवनगौरव साहित्यभूषण पुरस्कार जाहीर झाला असून, त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
शहरातील राजापूर नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये सकाळी १० वा. होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या वेळी स्वागताध्यक्ष म्हणून राजापूर नगर वाचनालयाचे अध्यक्ष प्रभात पाध्ये, कवी संमेलनाध्यक्ष म्हणून रत्नागिरी येथील ज्येष्ठ कवयित्री आकांक्षा निगुडकर उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी कोल्हापूर येथील कवयित्री रेखा दीक्षित, माजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी सुरेश लोहार, माजी पोलिस आयुक्त ज्येष्ठ लेखक विनायकराव जाधव, सिद्धार्थ कुळकर्णी, ज्येष्ठ कवी राजेश थळकर यांच्यासह माजी संमेलनाध्यक्ष, बालसाहित्यिक मदन हजेरी, मानसी हजेरी, आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, संदीप पाटील, युवानेते मंदार सप्रे, दत्ता वालावलकर, जयंत अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे औचित्य साधून राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रथम नोंदणी झालेल्या तीन कवींना कवितांचे सादरीकरण करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांसह उत्तेजनार्थ दोन पारितोषिक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरवण्यात येणार आहे तर, सहभागी कवींना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
तीन मिनिटांची कविता
विनामूल्य प्रवेश असलेल्या या काव्यस्पर्धेमध्ये तीन मिनिटांमध्ये कविता सादर करायची आहे. या कार्यक्रमांना जास्तीतजास्त साहित्यिकांसह लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर आणि मुंबई महानगर प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कुलकर्णी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.