भात शेतीच्या नुकसानीची
भरपाई मिळावी : नीतेश राणे
कणकवली, ता. १७ : गेल्या पंधरा दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकणातील खरीप हंगामातील मुख्य पीक असलेली भातशेती सध्या कापणीच्या स्थितीत आलेली आहे. परंतु दररोज कोसळणाऱ्या परतीच्या मुसळधार पावसामुळे भात शेतीचे कुजून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळावी, अशा मागणीचे निवेदन आमदार नीतेश राणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
यात म्हटले आहे, जिल्हात सध्या परतीचा पाऊस होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने वाहून गेल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाह कसा करावा हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या भातशेतीच्या नुकसानीबाबत कृषी विभागाकडून त्वरित पंचनामे तयार करण्यात येऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनास अहवाल सादर करावा, अशी ही विनंती श्री. राणे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.