१९५००
धामापूरकर कुटुंबीयांकडून
करजुवे विद्यालयाला सीसीटीव्ही
सावर्डे, ता. १७ ः संगमेश्वर तालुक्यातील करजुवे पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाला खेर्डीचे उपअभियंता विजय धामापूरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून सीसीटीव्ही कॅमेरे आणि टीव्हीसंच भेट देण्यात आले. मातोश्री शारदा धामापूरकर यांच्या हस्ते सीसीटीव्ही संचाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य शशिकांत नलावडे, माजी पंचायत समिती सभापती सुभाष नलावडे, संचालिका प्रिया नलावडे, संचालक शामसुंदर माने, विजय धामापूरकर आदी उपस्थित होते. या वेळी प्राचार्य नलावडे म्हणाले, ‘धामापूरकर कुटुंबीयांचे काम हे समाजासाठी आदर्शवत आहे. आपुलकीतूनच शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही संच भेट दिला आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.