कोकण

सागरी महामार्गावर आंबोळगड बनणार विकास केंद्र

CD

rat१७p३४.jpg -
२४N१९६२७
राजापूर ः मच्छीमार बांधवांची होडी लोटण्याची सुरू असलेली लगबग.
rat१७p३५.jpg, rat१७p३६.jpg -
P२४N१९६२८,
राजापूर ः आंबोळगड समुद्रकिनारा.

आंबोळगड गाव बनणार विकास केंद्र

राजापूर तालुका ; सागरी महामार्गावर भविष्यात पर्यटनाला मिळणार चालना

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ ः कोकणातून रेवस-रेड्डी सागरी मार्ग (कोस्टल रोड) उभारण्यात येत आहे. त्या मार्गानजीक असलेल्या पर्यटनस्थळांचा विकास व्हावा यासाठी विकासकेंद्र उभारली जाणार आहेत. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील आंबोळगड गावाचा समावेश आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला भविष्यात अधिक चालना मिळणार आहे.
शासनातर्फे रेवस-रेड्डी सागरी मार्ग उभारण्यात येणार असून, हा मार्ग सागरकिनारी गावांमधून जाणार आहे. या मार्गामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरील गावे आणि शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. रेवस-रेड्डी सागरी मार्ग उभारण्याच्यादृष्टीने सध्या ठिकठिकाणी पूल उभारणीचे काम लवकरच सुरू होणार आहे. सागरी मार्गाची उभारणी करताना या मार्गावरील पर्यटकांची पसंती मिळालेल्या गावांमध्ये विकासकेंद्र उभारून शासनातर्फे तेथील पर्यटनाला अधिक चालना देण्यात येणार आहे. त्यात सागरी मार्गावरील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १०५ गावांमधील १३ गावांमध्ये शासनातर्फे विकासकेंद्राची उभारणी केली आहे. त्याचा आराखडा एमएसआरडीसीतर्फे हाती घेण्यात आले आहे. १३ विकासकेंद्र उभारणी करण्यात येणाऱ्‍या गावांमध्ये तालुक्यातील सागरी किनारपट्टीवरील आंबोळगड गावाचा समावेश आहे. या विकासकेंद्राच्या माध्यमातून आंबोळगडसह सागरी किनारपट्टीवरील पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
-------

वैशिष्ट्यपूर्ण आंबोळगड परिसर

आंबोळगडला सर्वाधिक लांबीचा किनारा लाभलेला आहे. या किनार्‍यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर जांभ्या कातळाच्या पठारावर श्री गगनगिरी स्वामींचा मठ आहे. आंबोळगडसह या परिसरात प्रसिद्ध वेत्ये बीच, कशेळी बीच, आडिवरे येथील प्रसिद्ध श्री महाकाली देवीचे मंदिर, कशेळीचे श्री कनकादित्य मंदिर हेही पाहण्याची संधी मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा? विश लिस्टवर म्हणाले...

IND vs NZ 2nd Test: विजयाचा 'घास' गेला, आता भारत-न्यूझीलंड दुसरा सामना केव्हा? करो वा मरो मॅच कुठे Live दिसणार?

परदेशात प्रिया बेर्डेंना चुकीची वागणूक, पाठीशी उभे राहिले जॉनी लिव्हर; अख्ख शूटिंग थांबवलं, शेवटी मॅनेजरने...

भाजप आमदाराच्या PAच्या पत्नीला पराभवाचा धक्का, निकालानंतर स्ट्रीट लाइट उतरवले; बिल भरायला दिला नकार

Latest Marathi News Live Update : मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड घाटात दोन ट्रकचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT