कोकण

शाळेचे छप्पर कोसळण्याचा प्रकार दुर्दैवी

CD

N19649

शाळेचे छप्पर कोसळण्याचा प्रकार दुर्दैवी
एकनाथ नाडकर्णीः केसरकर राज्याचा विकास कसा करणार ?
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १७ : राज्याचे शिक्षण मंत्री असलेले आमदार दीपक केसरकर यांच्याच मतदारसंघातील शाळांचे छप्पर कोसळण्याचे प्रकार घडतात, हे दुर्दैव आहे. शिक्षणमंत्र्यांचा ज्ञानमंदिरांकडे लक्ष नसल्याने अशा घटना घडत आहेत. अशा धोकादायक शाळेत मुलांना शिकविणे, हेही मुलांच्या जीवावर बेतणारे आहे. असे मंत्री राज्याचा विकास काय करतील, असा आरोप करत अशा अकार्यक्षम आमदाराला घरात बसविण्याची वेळ आली आहे, अशी टीका भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केली.
पाल-पुनर्वसन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याचे वृत्त कळताच नाडकर्णी यांनी शाळेला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. येणाऱ्या काळात आम्ही ही शाळा नव्याने बांधून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार  असल्याचे यावेळी सांगितले.
नाडकर्णी पुढे म्हणाले, ‘‘मंत्री केसरकर यांनी शिक्षणमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथम आपल्या भागातील शाळांची स्थिती जाणून घेणे क्रमप्राप्त होते. मात्र असे त्यांनी केले नाही. ते मुंबईत राहून मस्त आरामात राहत आहेत. मतदारसंघातील जनता काय करत आहे, याबाबत त्यांना कोणतेही सोयरसुतक राहिलेले दिसत नाही. आता निवडणूक जवळ आली असताना ते अनेक कामांच्या भूमिपूजनांचे कार्यक्रम करताना दिसत आहे; मात्र याआधी किती कामांची भूमिपूजने केली? ती सर्व कामे पूर्ण झाली का? याचा अभ्यासही सुज्ञ जनता करत आहे. येणाऱ्या काळात या शाळेच्या नवीन इमारत बांधणीसाठी आम्ही पक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहोत.’’
यावेळी मुख्याध्यापिका संकिता बेळेकर, भाजपचे कानू दळवी, रवी नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरत शिरसाट, शिल्पा राणे, सहशिक्षिका पूजा बिर्जे, वृषाली गवस, प्रेमकुमार डोळस उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi: धक्कादायक! भिवंडीत 17 जणांना विषबाधा, शोरमा खाताच मळमळ, पोटदुखी अन् ताप; परिसरात खळबळ

Pune News : पेपरफुटीला १० कोटींचा दंड! परीक्षा दिल्यास शुल्कही परत मिळणार

Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ साठी राजगड तालुक्यात कोट्यवधींचा निधी; आडवली-वेल्हे रस्त्याच्या कामात त्रुटी असल्याचा नागरिकांचा आरोप

Maharashtra Live news : माहुलीत शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध, मोजणीचे वाहन परतवून लावले

'झिम्मा ३' सिनेमाचं पोस्टर पाहिलंत पण या अभिनेत्याला ओळखलंत का? अमृता सुभाषसोबत जिंकलाय राष्ट्रीय पुरस्कार

SCROLL FOR NEXT