कोकण

ट्रक बंद पडल्याने पावसमध्ये वाहतूककोंडी

CD

rat१७p२७.jpg -
२४N१९६११
पावस ः रत्नागिरी ते नाटे या सागरी मार्गावरील भर पावस चौकात बंद पडलेला मालवाहू ट्रक.

ट्रक बंद पडल्याने पावसात वाहतूककोंडी

दोन तास वाहनांच्या रांगा; चालकाविरोधात कारवाई

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १७ ः रत्नागिरी ते नाटे सागरीमार्गावरील पावस चौकामध्ये एक मालवाहू ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूककोंडी झाली होती. सुमारे दोन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.
पावस परिसरामध्ये सागरी कवच अभियान सुरू असल्यामुळे या परिसरामध्ये अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्याप्रमाणे पावस चौकामध्ये नाकाबंदी करण्यात आली. तिथून जाणाऱ्या सर्वच वाहनांची तपासणी केली जात होती. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीवरून पूर्णगडमार्गे मालवाहू ट्रक जात होता. त्या ट्रकचे डिझेल संपल्यामुळे चौकात बंद पडला. त्यामुळे वाहतूककोंडी झाली. वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना नाकाबंदीऐवजी बंद पडलेल्या ट्रकमुळे झालेल्या कोंडीतील वाहतूक सुरळीत करण्यास सुरवात करावी लागली. दोन तासानंतर संबंधित ट्रकचालकाने डिझेल आणले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या प्रकारामुळे वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. गाडीतील डिझेल संपत आले असतानाही चालकाने हलगर्जीपणा केला होता. त्याचा फटका वाहनचालकांना बसला. वाहतूककोंडी करणाऱ्या चालकाविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT